सुदृढ राहण्यासाठी आरोग्याची काळजी घ्या ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2021 04:27 AM2021-01-21T04:27:08+5:302021-01-21T04:27:08+5:30
तिरोडा : आपल्या आरोग्याच्या बाबतीत काही ठराविक नियमांचे पालन कधीही फायद्याचेच ठरते. आहार आणि व्यायामातील नियमितपणा, तसेच झोपेच्या किंवा ...
तिरोडा : आपल्या आरोग्याच्या बाबतीत काही ठराविक नियमांचे पालन कधीही फायद्याचेच ठरते. आहार आणि व्यायामातील नियमितपणा, तसेच झोपेच्या किंवा कामाच्या नियमित सवयी या सर्वच गोष्टींनी आपले शारीरिक आणि मानसिक आरोग्य चांगले राहण्यास मदत होते. त्यामुळे सुदृढ राहण्यासाठी आरोग्याची काळजी घ्या, असे प्रतिपादन आ. विजय रहांगडाले यांनी केले.
जिल्हा वार्षिक आठ आरोग्य योजना २०२०-२१ अंतर्गत भजेपार येथे आरोग्य उपकेंद्र इमारतीकरिता ८० लाख रुपये मंजूर करण्यात आले. या उपकेंद्राच्या भूमिपूजन कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. या वेळी भाजप जिल्हा महामंत्री मदन पटले, भाजपा तालुकाध्यक्ष भाऊराव कठाणे, माजी जि.प.सदस्या रजनी कुंभरे, माजी जि.प.सदस्य छबिलाल पटले, पं. स. सदस्य धानसिंग बघेले, सरपंच वर्षा पंधरे, उपसरपंच लेखीराम बोपचे, युवा मोर्चा महामंत्री डॉ. शिशुपाल रहांगडाले, तं. मु. अध्यक्ष विजय रहांगडाले, नरेंद बिसेन, अशोक नंदेश्वर, मुलचंद रहांगडाले, ग्रा.पं. सदस्य तारेन्द्र बिसेन, छन्नुताई बिसेन, निमा भैरम, प्रतिमा कुंभरे, किसन मडावी, सोनम बिसने, आशा पटले उपस्थित होते.