‘त्या’ सहा गावांची निवडणूक घ्या

By admin | Published: June 15, 2017 12:19 AM2017-06-15T00:19:53+5:302017-06-15T00:19:53+5:30

नोव्हेंबर २०१७ मध्ये आमगाव तालुक्यातील ३९ ग्रा.पं. तर डिसेंबर महिन्यात एका ग्रा.पं. ची निवडणूक घेण्यात येणार आहे.

Take that 'election of six villages' | ‘त्या’ सहा गावांची निवडणूक घ्या

‘त्या’ सहा गावांची निवडणूक घ्या

Next

निवडणूक आयोगाचे पत्र : नागरिकांमध्ये आनंद
लोकमत न्यूज नेटवर्क
आमगाव : नोव्हेंबर २०१७ मध्ये आमगाव तालुक्यातील ३९ ग्रा.पं. तर डिसेंबर महिन्यात एका ग्रा.पं. ची निवडणूक घेण्यात येणार आहे. आमगाव नगर परिषद की नगर पंचायत यासाठी मागील दोन वर्षापासून प्रकरण रेंगाळत पडल्यामुळे आमगावच्या आजीबाजूच्या सहा ग्राम पंचायतींच्या निवडणूका घ्यायच्या का नाही असा संभ्रम तालुका प्रशासनात होता. त्या संभ्रमावर निवडणूक आयोगाच्या सचिवांना पत्र पाठवून मार्गदर्शन मागितले असता त्या सहाही ग्राम पंचायतची निवडणूक घ्या असे पत्र निवडणूक आयोगाने प्रशासनाला दिले आहे.
आमगाव तालुक्यातील ४० ग्राम पंचायतींच्या सार्वत्रीक निवडणुका आहेत. त्यातील ३९ ग्राम पंचायतच्या निवडणुका नोव्हेंबर २०१७ या वर्षात आहेत. त्यात गिरोला, भोसा, सितेपार, बुराडीटोला, टेकरी, बोदा, टाकरी, ननसरी, डोंगरगाव, सुपलीपार, भजीयापार, बनगाव, नंगपूरा, करंजी, सुरकुडा, धामनगाव, मोहगाव, कातुर्ली, बोथली, जवरी, दहेगाव, मानेगाव, किडंगीपार, गोरठा, खुर्शीपार, खुर्शीपारटोला, पाऊलदौना, तिगाव, बघेडा, कवडी, फुक्कीमेटा, पानगाव, बोरकन्हार, पदमपूर, सावंगी, बाम्हणी, पिपरटोला, माल्ही, बिरसी या ग्राम पंचायतींचा समावेश आहे. तर डिसेंबर महिन्यात रिसामा या ग्राम पंचायतीची निवडणूक आहे.
परंतु आमगावला नगर पंचायत कि नगर परिषद ही बाब अद्याप स्पष्ट न झाल्याने आमगावच्या नगर परिषदेच्या परिसरात येणाऱ्या आठ गावांमध्ये संभ्रमाची स्थिती होती. हीच संभ्रामाची स्थिती नागरिकांमध्येही व तालुका प्रशासनामध्येही होती.
शासनाने आमगाव १२ फेब्रुवारी २०१५ ला नगर पंचायत जाहीर केले. त्यानंतर आमगावला नगर परिषद हवी म्हणून जनहित याचीका टाकण्यात आली होती. त्यानंतर उच्च न्यायालयाने ही बाब शासनावर सोपविली. शासनाने ६ जानेवारी २०१७ ला उदघोषणा करून आक्षेप मागविले होते. यासंदर्भात १५ हजारापेक्षा अधिक नागरिकांनी आक्षेप नोंदविले होते. तर आमगावातील काही नागरिकांनी समर्थनार्थ ही निवेदन दिले होते. परंतु पदमपूर, रिसामा, कुंभारटोली, बिरसी, किडंगीपार, बनगाव, माल्ही या गावांचा नगर परिषदेला विरोध होता. परंतु आक्षेप मोठ्या प्रमाणात असल्यामुळे शासनानेही आमगाव नगर पंचायत की नगर परिषद यासंर्भात कसलाही निर्णय घेतला नाही. अश्या संभ्रमाच्या स्थितीवर तहसीलदारांनी निवडणूक आयोगाला पत्र पाठवून मार्गदर्शन मागितले होते. त्या पत्राच्या आधारे नोव्हेंबरमध्ये असलेल्या बनगाव, पदमपूर, माल्ही, बिरसी, किडंगीपार, तर डिसेंबर महिन्यात होणाऱ्या रिसामा या ग्राम पंचायतींची निवडणूक घ्या असे निवडणूक आयोगाने सूचविले. या निर्णयामुळे आमगाव नगर परिषदेला विरोध करणाऱ्या ग्राम पंचायतीतील नागरिकांमध्ये आनंद आहे.

संभ्रमात असलेल्या ग्रा.पं. च्या निवडणूक संदर्भात निवडणूक आयोगाला मार्गदर्शन मागितले होते. यात पदमपूर, बनगाव, बिरसी, माल्ही, किडंगीपार व रिसामा या ग्राम पंचायतीच्या निवडणूक घेण्यासाठी प्रभाग रचना रावी, आरक्षण कार्यक्रम घेण्यात यावे असे निर्देश निवडणूक आयोगाकडून देण्यात आले आहेत.
साहेबराव राठोड
तहसीलदार आमगाव.

Web Title: Take that 'election of six villages'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.