बुद्धविहार प्रकरणातील दोषींवर तत्काळ कारवाई करा ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2021 04:33 AM2021-09-05T04:33:00+5:302021-09-05T04:33:00+5:30

गोंदिया : तालुक्यातील मोरवाही येथे बुद्ध विहार तोडल्या संदर्भात न्याय मिळावा म्हणून बौद्ध समाज बांधवांचे १२ ऑगस्ट धरणे आंदोलन ...

Take immediate action against the culprits in Buddha Vihar case () | बुद्धविहार प्रकरणातील दोषींवर तत्काळ कारवाई करा ()

बुद्धविहार प्रकरणातील दोषींवर तत्काळ कारवाई करा ()

Next

गोंदिया : तालुक्यातील मोरवाही येथे बुद्ध विहार तोडल्या संदर्भात न्याय मिळावा म्हणून बौद्ध समाज बांधवांचे १२ ऑगस्ट धरणे आंदोलन सुरु आहे. यात समाज बांधवांकडून प्रशासनाला अनेक निवेदन व पोलिसात तक्रार सुद्धा करण्यात आली. परंतु प्रशासनातर्फे अद्यापही दोषींवर कारवाई न झाल्याने येथील बौद्ध समाजबांधवांच्या भावना संतप्त झाल्या आहेत. दोषींवर त्वरित कारवाई करून त्वरित नवीन बुद्ध विहार बांधून द्यावे, अन्यथा सर्व समाजबांधव रस्त्यावर उतरून आंदोलन करू, असा पवित्रा येथील बौद्ध समाजबांधवांनी घेतला आहे.

मागील दोन वर्षांपूर्वी पवन हेमणे, चंद्रभान ठाकूर, राजू ब्राह्मणकर कंत्राटदारांनी शासनाकडून कोणतीही परवानगी न घेता यथा स्थितीत असलेले जुने बुद्ध विहार नवीन बनवून देण्याच्या नावाखाली जमिनदोस्त केले. या प्रकरणाला दोन वर्षापेक्षा जास्त काळ लोटला तरी अजूनही या कंत्राटदारांनी नवीन बुद्ध विहार बांधून दिले नाही. त्यामुळे येथील बौद्ध समाज बांधवांना आपल्या धार्मिक विधी पूर्ण करण्यासाठी मोठी अडचण येत असून ते धार्मिक विधी पूर्ण करण्यापासून वंचित राहात आहेत. ग्रामपंचायत प्रशासन व कनिष्ठ, कार्यकारी अभियंता जि.प. गोंदिया यांनी या बांधकामाची खोटी मोजमाप पुस्तिका सादर करून सदर बुद्ध विहार बांधकामासाठी आलेल्या शासकीय निधीची उचल करून अफरातफर केल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे. दरम्यान येथील बौद्ध समाजबांधवांनी या प्रकरणाची तक्रार शासन स्तरावर जिल्हा प्रशासनाकडे करून ग्रामपंचायत सरपंच, ग्रामसेवक, कनिष्ठ, कार्यकारी अभियंता व संबंधित तिन्ही कंत्राटदारावर पोलिसात तक्रार दाखल केली आहे.

.............

तक्रारीनंतरही कारवाई नाही

पोलीस तक्रारीला आठ दिवसांपेक्षा जास्त काळ लोटला तरी अजूनही पोलीस प्रशासनाने या आरोपींची साधी चौकशी सुद्धा केली नाही. जिल्ह्यात एवढे मोठे आंदोलन सुरु असतानाही एकाही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या आंदोलनाला भेट दिली नाही.

...........

आंदोलन तीव्र करणार

याप्रकरणाची सखोल चौकशी करुन दोषींवर कठोर कारवाई न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा पत्रकार परिषदेत दिलीप मेश्राम, विजय मेश्राम, आशिष मेश्राम, राजकुमार मेश्राम, सचिन मेश्राम, अजय भालाधरे, रजनीकांत वैद्य, अर्चना भिमटे,सारिका मेश्राम,सुलोचना वैद्य, संगीता मेश्राम, शीला मेश्राम, शालिनी मेश्राम, माधुरी मेश्राम, अनिल मेश्राम, पंचम मेश्राम, कपिल रामटेके, पिंटू मेश्राम यांनी दिला.

Web Title: Take immediate action against the culprits in Buddha Vihar case ()

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.