नुकसान टाळण्यासाठी उपाययोजना करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2018 09:58 PM2018-05-12T21:58:55+5:302018-05-12T21:58:55+5:30

अलीकडच्या काळात वानरांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असून मानवी वस्तीतही त्यांचा हैदोस वाढला आहे. शेतकरी आधुनिक व परंपरागत पद्धतीने शेती करतो. परंतु वानरांचे कळपाने येवून शेत पिकांचे नुकसान करतात.

Take measures to avoid losses | नुकसान टाळण्यासाठी उपाययोजना करा

नुकसान टाळण्यासाठी उपाययोजना करा

Next
ठळक मुद्देक्षीरसागर यांची मागणी : २५ सरपंचांच्या स्वाक्षरीचे कृषी व वनमंत्र्यांना निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्क
तिरोडा : अलीकडच्या काळात वानरांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असून मानवी वस्तीतही त्यांचा हैदोस वाढला आहे. शेतकरी आधुनिक व परंपरागत पद्धतीने शेती करतो. परंतु वानरांचे कळपाने येवून शेत पिकांचे नुकसान करतात. त्यामुळे त्यांची संख्या नियंत्रणात आणणे गरजेचे आहे. त्यासाठी नसबंदी हा उत्तम उपाय असल्याचे चिखली निवासी अशोकुमार क्षीरसागर यांनी म्हटले आहे. यासाठी परिसरात जनजागृती करुन २५ सरपंचांच्या स्वाक्षरीचे निवेदन राज्याचे कृषी व वनमंत्री यांना पाठविले आहे.
वानरांपासून घरांचे कवेलू भाजीपाला, फळे, जवस, लाखोळी, तूर इत्यादीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असून ते थांबणे गरजेचे आहे. ही बाब समजून घेत चिखलीचे सरपंच कैलाश पटले, भिवापूरचे सिद्धार्थ रंगारी, इंदोराच्या हेमलता खोब्रागडे, निमगावचे मनोहर फरकुडे, खमारीचे रमेश रहांगडाले, डोंगरगावचे दिलीपकुमार बिसेन, सुकडी-डाकरामच्या चेतना बावनथडे, ठाणेगावचे तिर्थराज बागडे, गराडाच्या ललीता टिलगामे, मलपुरीचे लच्छु बिसेन, बिरसी फाटाच्या पद्मा वैद्य, लाखेगावचे नरेश जुनेवार, विहीरगावच्या अनुसया इळपाते, बोपेसरचे छत्रपती नागपूरे, सरांडीच्या शोभा कांबडी, पांजराचे राजेंद्र चामट, मुंडीकोटाच्या निर्मला भांडारकर, नवेगाव खुर्दच्या मंदा कुंभरे, घोगराचे रुपेश भोंडेकर, घाटकुरोडाच्या निर्मला डोंगरवार, चांदोरीचे जयसिंग उपासे, बिरोलीच्या जयश्री बाभरे, सालेबर्डीचे विनोद लिल्हारे, मांडवीचे दुर्गाप्रसाद दमाहे, मुंडीपारच्या शिला साठवणे, मेंदीपूरच्या मुक्ता रहांगडाले या सर्व सरपंचांनी क्षीरसागर यांच्या योजनेला पाठींबा दर्शवून स्वाक्षरी दिली.
ही जनजागरण मोहीम मागील ७ वर्षापासून सुरु केली असून याबाबत आमदार विजय रहांगडाले यांनाही माहिती दिली. मंत्रालयातून या मोहिमेला प्राधान्य देत शासनाकडून याची अंमलबजावणी करण्याचे आश्वासन दिले आहे. अशी नसबंदी अन्य राज्यात करण्यात येत असून बंदराच्या संख्येवर आळा घालण्यात येत आहे. त्या धर्तीवर महाराष्ट्रात सुद्धा याची अंमलबजावणी करुन यामुळे होणारे शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्याची मागणी क्षीरसागर यांनी कृषी व वनमंत्र्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.

Web Title: Take measures to avoid losses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Monkeyमाकड