पक्षाची विचारसरणी घरा-घरात पोहोचवा ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2021 04:26 AM2021-07-26T04:26:42+5:302021-07-26T04:26:42+5:30
सडक-अर्जुनी : जिल्ह्याला प्रफुल्ल पटेल यांच्यासारखे खंबीर नेतृत्व मिळाले असून कोरोना संक्रमणाच्या काळात जे कार्य त्यांनी केले, ते इतर ...
सडक-अर्जुनी : जिल्ह्याला प्रफुल्ल पटेल यांच्यासारखे खंबीर नेतृत्व मिळाले असून कोरोना संक्रमणाच्या काळात जे कार्य त्यांनी केले, ते इतर कुणीही करू शकत नाही. येत्या काळात जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका असून त्या महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे पक्ष मजूबत झाला पाहिजे. यासाठी तालुक्यात बुथ कमिटी तयार करून संघटना बळकट करा व पक्षाची विचारसरणी घरा-घरांत पोहोचवा, असे प्रतिपादन माजी आमदार राजेंद्र जैन यांनी केले.
कोहमारा येथे जिल्हा परिषद क्षेत्रातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. सभेत आमदार मनोहर चंद्रिकापुरे, जिल्हाध्यक्ष विजय शिवनकर प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी जिल्हा परिषद क्षेत्रातील कार्यकता व पदाधिकाऱ्यांशी महत्त्वपूर्ण मुद्द्यांवर चर्चा करून कार्यकर्त्यांना जिल्हा परिषद पर्यवेक्षकाची जबाबदारी देण्यात आली.
बैठकीला विशाल शेंडे, प्रभाकर डोनोडे, रमेश चुर्हे, डॉ. अविनाश काशिवार, डी. यु. रहांगडाले, छाया चव्हाण, रजनी गिऱ्हेपुंजे, मंजू डोंगरवार, संगीता ब्राम्हणकर, देवचंद तरोणे, दिनेश कोरे, शुभांगी वाळवे, नरेश भांडारकर, ओमप्रकाश टेंभुर्णे, कृष्णा कोरे, आशिष येरणे, मीलन राऊत, भूमेश्वर शिवनकर, इकबाल शेख, एफआरटी शहा, आनंद लंगेश्वर, आनंद इडपाते यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.