गोंदिया-भंडारा जिल्ह्याचा सांभाळ हेच जीवन प्रवासाचे गमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2022 05:00 AM2022-06-13T05:00:00+5:302022-06-13T05:00:10+5:30

मागील ३२ वर्षांपासून लोकसभा व राज्यसभेत प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली. हे माझे सौभाग्य आहे. गोंदिया व भंडारा जिल्ह्याचे सर्वात मोठे दायित्व माझ्या खांद्यावर आहे, हे मी कधीही विसरणार नाही. या दोन्ही जिल्ह्याच्या विकासासाठी सदैव झटत राहणार. मी गोंदिया जिल्ह्याचा विकासासाठी कसलेही राजकारण आडकाठी येवू देत नाही. गोंदिया व भंडारा हे दोन्ही जिल्हे माझे कुटुंब आहेत, अशीही ग्वाही खा. पटेल यांनी दिली.

Taking care of Gondia-Bhandara district is the essence of life journey | गोंदिया-भंडारा जिल्ह्याचा सांभाळ हेच जीवन प्रवासाचे गमक

गोंदिया-भंडारा जिल्ह्याचा सांभाळ हेच जीवन प्रवासाचे गमक

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया :  गोंदिया : गोंदिया व भंडारा या दोन्ही जिल्ह्याशी आपल कौटुंबिक नाते आहे. दोन्ही जिल्ह्यात राजकीय व सामाजिक कामे करताना अनेक चढ-उताराला समोर जावे लागले. मात्र, या जिल्ह्यातूनच मला प्रतिनिधित्वाची संधी मिळाली. हे माझे सौभाग्य आहे. मी कितीही शिखरावर असलो तरी माझ्या जीवन प्रवासात दोन्ही जिल्ह्याचा सांभाळ खांद्यावर आहे. हे कधीही स्मरणात राहते. त्यामुळे या दोन्ही जिल्ह्याचा सांभाळ जीवन प्रवासाचे गमक आहे, अशी स्पष्टोक्ती खा. प्रफुल्ल पटेल यांनी दिली.
राज्यसभेवर पुन्हा निर्वाचित झाल्यानंतर खा. प्रफुल्ल पटेल या आज (ता.११) गोंदिया व भंडारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. यानिमित्त स्थानिक नमाद महाविद्यालयाच्या आडोटोरियम येथे २०० हून अधिक संस्था व संघटनातर्फे आयोजित नागरी सत्कार कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. खा. पटेल पुढे म्हणाले, मागील ३२ वर्षांपासून लोकसभा व राज्यसभेत प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली. हे माझे सौभाग्य आहे. गोंदिया व भंडारा जिल्ह्याचे सर्वात मोठे दायित्व माझ्या खांद्यावर आहे, हे मी कधीही विसरणार नाही. या दोन्ही जिल्ह्याच्या विकासासाठी सदैव झटत राहणार. मी गोंदिया जिल्ह्याचा विकासासाठी कसलेही राजकारण आडकाठी येवू देत नाही. गोंदिया व भंडारा हे दोन्ही जिल्हे माझे कुटुंब आहेत, अशीही ग्वाही खा. पटेल यांनी दिली.
यावेळी मंचावर आ. विनोद अग्रवाल, आ. मनोहर चंद्रिकापुरे, आ. राजू कारेमोरे, माजी आमदार राजेंद्र जैन, जि.प.उपाध्यक्ष यशवंत गणवीर, माजी नगराध्यक्ष अशोक इंगळे, माजी आमदार भेरसिंह नागपुरे, अनिल बावणकर, शिवसेनेचे मुकेश शिवहरे, राजु कुथे, दामोदर अग्रवाल, पं.स.सभापती मुनेश रहांगडाले यांच्यासह आदि मान्यवर उपस्थित होते. 
विशेष म्हणजे, खासदार पटेल यांची राज्यसभेत निवड झाल्यानंतर त्यांचे  शनिवारी आगमन झाल्यानंतर  गोरेगाव, सडक-अर्जुनी व तिरोडा येथेही राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्ष व विविध    सामाजिक संघटनांकडून सत्कार करण्यात आला. 

या संघटना व संस्थांनी केला सत्कार

गोंदिया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, राईस मिलर्स असोसिएशन, प्रेस ट्रस्ट ऑफ गोंदिया, जिल्हा श्रमिक पत्रकार संघ, श्रमिक पत्रकार संघ, संपादक संघ, लघु वृत्तपत्र संघ, गौरक्षण समिती, अग्रेसन समिती यासह २०० संघटना व संस्थांचा समावेश होता.

 

Web Title: Taking care of Gondia-Bhandara district is the essence of life journey

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.