गणित पेटी उपयोगावरील शिक्षक प्रशिक्षणाची सांगता
By admin | Published: January 23, 2017 12:27 AM2017-01-23T00:27:03+5:302017-01-23T00:27:03+5:30
प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र अंतर्गत समूह साधन केंद्र करटी बु. केंद्रात गणित पेटी उपयोग शिक्षक प्रशिक्षण घेण्यात आले.
प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र : १०० टक्के विद्यार्थी प्रगत होणे गरजेचे
परसवाडा : प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र अंतर्गत समूह साधन केंद्र करटी बु. केंद्रात गणित पेटी उपयोग शिक्षक प्रशिक्षण घेण्यात आले. केंद्राच्या नवोपक्रमशील केंद्रप्रमुख आर.बी. घोष यांच्या कल्पनेतून शिक्षक प्रशिक्षणाचे आयोजन दोन टप्यात करण्यात आले होते. पहिल्या टप्प्याचे प्रशिक्षण करटी बु. येथे तर दूसरा टप्पा जि.प. प्राथमिक शाळा बेरडीपार येथे घेण्यात आले.
प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र अंतर्गत २५ निकषांपैकी सात निकष गणित विषयाचे आहेत. गणित विषयामध्ये १०० टक्के विद्यार्थी प्रगत होणे गरजेचे असल्याने बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, नाणी-नोटा संकल्पना, घड्याळ, एकक, दशक, शतक संकल्पना, अपूर्णांक यावरील संबोध कसे सादर करता येथील, याकरिता गणित पेटी उपयोग शिक्षक प्रशिक्षण आर.बी. घोष केंद्रप्रमुख यांनी आयोजित केले होते.
प्रशिक्षण वर्गाला आर.एस. शहारे, जे.के. डोंगरे, आर.टी. पटले यांनी मार्गदर्शन केले. गणितीय साहित्य जोडोबार, मॅथेमेटीक , सरपट गणित, स्थानिक किंमत दर्शविणारा तक्ता, परिमिती व क्षेत्रफळ, गणितीय आकार, संख्या रेखा, नंतर बॅलेन्स, मॅचिंग सेट, भूमितीय ठोकळे, तराजू, घन यांचा वापर मनोरंजक पद्धतीने अध्यापणार कसा करावा, हे प्रशिक्षणात शिक्षकांना सांगण्यात आले. प्रशिक्षणाला केंद्रांतर्गत शाळांतील शिक्षकांनी सहभाग घेतला.
प्रशिक्षणाच्या यशस्वी आयोजनासाठी केंद्राध्यक्ष रहांगडाले, एल.एम. ढबाले, व्ही.डी. पटले, शीला पारधी, हेमंत बिसेन, संतोष ठाकरे, दिलीप हिरापुरे, विजय भगत, के.एम. चौधरी, पी.डी. देशमुख, पी.के. भगत, डी.डी. शहारे, अशोक रिनाईत यांनी सहकार्य केले. (वार्ताहर)
केंद्रस्तरीय पथकाकडून होणार मूल्यमापन
प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र अंतर्गत नवोपक्रशील केंद्रप्रमुख आर.बी. घोष यांनी २५ निकष पडताळणीचा दुसरा टप्पा केंद्रात लवकर घेण्याचे नियोजित केले आहे. पहिला टप्पा यशस्वी झाल्यानंतर त्याची दखल जिल्हास्तरावर घेण्यात आली होती. दुसऱ्या टप्प्यातील केंद्रातील सर्व शाळांचे केंद्रस्तरीय पथकामार्फत मूल्यमापन घेण्याचे नियोजित केले असल्याचे केंद्रप्रमुख आर.बी. घोष यांनी सांगितले.