धानाच्या हमीभावात वाढ करण्यासाठी पवार यांच्याशी चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2018 09:34 PM2018-12-22T21:34:18+5:302018-12-22T21:35:03+5:30

सध्या स्थितीत धानाची शेती करणे शेतकऱ्यांसाठी तोट्याचा सौदा झाला आहे. लागवड खर्चाच्या तुलनेत धानाला मिळणार हमीभाव फारच कमी असल्याने धान उत्पादक शेतकरी कर्जबाजारी होत आहे.

Talk to Pawar about the increase in the loss of money | धानाच्या हमीभावात वाढ करण्यासाठी पवार यांच्याशी चर्चा

धानाच्या हमीभावात वाढ करण्यासाठी पवार यांच्याशी चर्चा

Next
ठळक मुद्देशरद पवार, प्रफुल्ल पटेल आज जिल्ह्यात : लाभाच्या शेतीबाबत घेणार सल्ला

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : सध्या स्थितीत धानाची शेती करणे शेतकऱ्यांसाठी तोट्याचा सौदा झाला आहे. लागवड खर्चाच्या तुलनेत धानाला मिळणार हमीभाव फारच कमी असल्याने धान उत्पादक शेतकरी कर्जबाजारी होत आहे. धानाच्या हमीभावात वाढ करून शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांचे शिष्टमंडळ खा. प्रफुल्ल पटेल यांच्या नेतृत्त्वात राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेवून चर्चा करणार आहे.
रिलायन्स कॅन्सर हॉस्पीटलचे उद्घाटन व राज्य स्तरीय शिक्षक साहित्य संमेलनाला उपस्थित राहण्यासाठी शरद पवार व प्रफुल्ल पटेल रविवारी (दि.२३) गोंदिया जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. या वेळी राष्टÑवादी काँग्रेसचे माजी आ.राजेंद्र जैन, माजी मंत्री नाना पंचबुध्दे, मा.आ.दिलीप बन्सोड, अनिल बावनकर, विजय शिवनकर, नरेश माहेश्वरी, सुनील फुंडे, धनंजय दलाल, पंचम बिसेन, गंगाधर परशुरामकर, राजलक्ष्मी तुरकर, कल्याणी भुरे, विवेकानंद कुर्झेकर, मनोहर चंद्रिकापुरे, रमेश ताराम, धनेंद्र तुरकर, रेखा ठाकरे, किशोर तरोणे आदी पदाधिकारी पवार यांच्याशी चर्चा करणार आहेत. संकटात सापडलेल्या शेतकºयांना लाभाची शेती करता यावी. शेतमालाला योग्य भाव मिळावा, छत्तीसगड, मध्यप्रदेशाप्रमाणेच महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी मिळावी, धानाला २५०० रुपये हमीभाव देण्यात यावा. या विषयावर चर्चा करण्यात येणार आहे. गोंदिया-भंडारा जिल्ह्यात सर्वाधिक धानाची शेती केली जाते. मात्र धानाला अल्पभाव मिळत असल्याने ही शेती करणे तोट्याचा सौदा ठरत आहे.त्यामुळे धानाची शेती लाभाची कशी करता येईल, यासंदर्भात पवार यांचे मार्गदर्शन घेण्यात येणार आहे. शेतकऱ्यांना आर्थिक दृष्टया सक्षम करण्यासाठी पवार यांच्या माध्यमातून शासनाकडे पाठपुरावा करण्यात येणार आहे. प्रफुल्ल पटेल हे सदैव शेतकऱ्यांच्या पाठीशी असून त्यांच्याच पुढाकाराने धान उत्पादक शेतकऱ्यांच्या विकासासाठी निश्चित यशस्वी प्रयत्न करण्यात येईल असा विश्वास आ.जैन यांनी व्यक्त केला आहे.

Web Title: Talk to Pawar about the increase in the loss of money

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.