प्राथमिक शिक्षक समितीचा तालुकास्तरीय मेळावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2018 09:23 PM2018-07-30T21:23:54+5:302018-07-30T21:24:10+5:30
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती शाखा सालेकसाच्या वतीने महाराष्ट्र राज्य शिक्षक समितीचा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या तालुकास्तरीय मेळाव्यात तालुक्यातून जाणाऱ्या व तालुक्यात येणाऱ्या शिक्षकांचा सत्कार करण्यात आला.
Next
ठळक मुद्देशिक्षकांच्या समस्यांवर चर्चा : समितीने केला शिक्षकांचा सत्कार, मान्यवरांची उपस्थिती
<p>लोकमत न्यूज नेटवर्कसालेकसा : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती शाखा सालेकसाच्या वतीने महाराष्ट्र राज्य शिक्षक समितीचा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या तालुकास्तरीय मेळाव्यात तालुक्यातून जाणाऱ्या व तालुक्यात येणाऱ्या शिक्षकांचा सत्कार करण्यात आला.
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीची स्थापना २२ जुलै १९६२ रोजी झाली. शिक्षकांच्या विविध समस्या सोडविण्याचे काम शिक्षक समितीच्या माध्यमातून करण्यात आले. तालुका ते राज्यस्तरावरुन विद्यार्थी, पालक व शिक्षकांच्या समस्या सोडविण्याचे काम अविरतपणे शिक्षक समिती करीत आली आहे. न्यायाची चाल आणि अन्यायाचा विरोध करणारी राज्यातली मोठी संघटना समिती आहे.
मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी पंचायत समिती सालेकसाचे माजी व आमगावचे गटशिक्षणाधिकारी वाय.सी. भोयर होते. प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हाध्यक्ष मनोज दीक्षित, जिल्हा सरचिटणीस एल.यू. खोब्रागडे, राज्य कार्यकारिणी सदस्य तथा संचालक किशोर डोंगरवार, उपाध्यक्ष विनोद बडोले, संचालक एन.बी. बिसेन, संदीप तिडके, शिक्षण विस्तार अधिकारी एन.पी. चिखलोंढे, भंडाराचे उपाध्यक्ष सुरेश कश्यप, राज्य संघटक व्ही.जी. राठोड, केंद्रप्रमुख एच.पी. पटले, डी.एल. गुप्ता, एस.सी. पारधी, संदीप मेश्राम, अनिल टेंभुर्णीकर, दीपक कावसे, आर.वाय. मस्करे उपस्थित होते.
सत्कारमूर्ती म्हणून संघातून समितीमध्ये प्रवेश केलेले माजी संचालक एस.जे. जोगी, तालुक्यात येणारे सहायक शिक्षक दिलीप नवखरे, पठाण, के.एन. किरसान, एस.बी. रहांगडाले, फरदे, राजेश जैन, बोपचे, उर्मिला मरकाम उपस्थित होते. शिक्षकांना मार्गदर्शन करताना जिल्हाध्यक्ष मनोज दीक्षित म्हणाले, शिक्षक समितीच्या माध्यमातून आम्ही शिक्षकांच्या समस्या तालुका ते राज्यस्तरापर्यंत सोडविण्याचे कार्य करीत आहोत. आपल्या जिल्ह्यात शिक्षक समिती ही मोठी संघटना म्हणून ओळखली जाते. या समितीमध्ये सर्व कार्यकर्ते आक्रमक भूमिका घेवून शिक्षकांच्या समस्या सोडविण्यास समर्थ आहेत.
या प्रसंगी तालुका कार्याध्यक्ष टी.आर. लिल्हारे, जिल्हा सरचिटणीस एल.यू. खोब्रागडे, राज्य कार्यकारिणी सदस्य किशोर डोंगरवार, विनोद बडोले, संचालक संदीप तिडके, एन.बी. बिसेन, कर्मचारी पतसंस्थेचे उपाध्यक्ष सुरेश कश्यप, केंद्र प्रमुख डी.एल. गुप्ता, माजी संचालक एस.जे. जोगी, राजेश जैना, जयेश लिल्हारे यांनी मनोगत व्यक्त केले. तसेच सत्कारमूर्तींना शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला. यात शिक्षकांच्या विविध समस्यांवर चर्चा करण्यात आली. मेळाव्यात गोंदिया, देवरी, आमगाव, सडक अर्जुनी, मोरगाव अर्जुनी येथील शिक्षक सहभागी झाले होते.
अध्यक्षीय भाषणातून गटशिक्षणाधिकारी वाय.सी.भोयर म्हणाले, शिक्षक, अधिकारी आणि पदाधिकारी यांच्यात समन्वय असले पाहिजे. त्यामुळे समस्या सोडविण्यास मदत होईल. आम्ही अधिकारी पण समस्या सोडविण्यासाठी सदैव प्रयत्न करतो आणि शिक्षकांचे हिताचे काम करतो, असे ते म्हणाले.
प्रास्ताविक शिक्षक समिती अध्यक्ष एस.बी. दमाहे यांनी मांडले. संचालन पी.बी. लांजेवार यांनी केले. आभार राजकुमार बसोने यांनी मानले. कार्यक्रमासाठी कार्याध्यक्ष टी.आर. लिल्हारे, उपाध्यक्ष ओ.एच. लिल्हारे, आर.एस. वानखेडे, झेड.बी. उके, डी.बी. बरैया, जयेश लिल्हारे, एस.पी. बैठवार, पी.एम. ढेकवार, आर.सी. नागपुरे, बी.के. मोहबे, आर.एस. बसोने, प्रकाश चौधरी, डी.एस. कुराहे, के.झेड. लिल्हारे, आर.जी. नागपुरे, कबिर माहुले, महिला प्रतिनिधी अनिता बोरकर, ए.बी. बोरकर, दिलीप कुहटकर, डी.बी. दहीलकर, उमेश नागपुरे, पी.पी. नागपुरे, फरदे, मेहरचंद बैठवार, पारधी, टी.एन. बैठवार, डी.एन. गोलीवार, चव्हाण, एस.डी. रहांगडाले, एम. पी. म्याकलवार, एम.पी. माहुले यांनी सहकार्य केले.