तालुकास्तरीय रानभाज्या महोत्सव ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2021 04:32 AM2021-08-13T04:32:37+5:302021-08-13T04:32:37+5:30
बोंडगावदेवी : महाराष्ट्र शासन कृषी विभाग अंतर्गत तालुका कृषी अधिकारी कार्यालय अर्जुनी मोरगाव व तालुका कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा ...
बोंडगावदेवी : महाराष्ट्र शासन कृषी विभाग अंतर्गत तालुका कृषी अधिकारी कार्यालय अर्जुनी मोरगाव व तालुका कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) यांच्या संयुक्त विद्यमाने तालुकास्तरीय रानभाज्या महोत्सव सप्ताहाचे आयोजन तालुका स्थळी बस स्थानकासमोर करण्यात आले होते. रानभाजी महोत्सवाचे उद्घाटन तालुका शेतकरी सल्लागार समितीचे अध्यक्ष रतीराम राणे यांच्या हस्ते करण्यात आले.
शहीद भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीदिनाचे औचित्य साधून आयोजित रानभाजी महोत्सव कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ताडगावचे सरपंच भुनेश्वर बोरकर, झरपडाचे सरपंच कुंदा डोंगरवार, बाजार समितीचे प्रशासक उद्धव मेंहदळे, एसएसजे महाविद्यालयाचे प्राचार्य अश्वीन चंदेल, प्रा. डॉ. राजेश चांडक, उमेदचे तालुका व्यवस्थापक रेशीम नेवारे, अर्जुनी मोरगावचे मंडळ कृषी अधिकारी सुधिर वरखडे, नवेगावबांधचे मंडळ कृषी अधिकारी कुमोदिनी बोरकर उपस्थित होते. तालुकास्तरीय रानभाज्या महोत्सवात शेतकऱ्यांनी सुरु, बांबू, कुडा, शेंगा, काटवाल, केवकंद, शतावरी पालेभाज्या तसेच कंद भाज्या, फळ भाज्या, फुल भाज्या आणल्या होत्या. शरीराला पोषक अशा भाज्या सहज उपलब्ध झाल्याने अनेक ग्राहकांनी खरेदी केल्या. कार्यक्रमाचे संचालन करुन आभार तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक विलास कोहाडे यांनी मानले. महोत्सवाच्या आयोजनासाठी तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.