जलयुक्त शिवार लोकचळवळ झाल्यास टँकरमुक्ती शक्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2018 08:53 PM2018-05-14T20:53:30+5:302018-05-14T20:54:08+5:30

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या संकल्पनेतून साकारलेली जलयुक्त शिवार योजना महत्वाकांक्षी व राज्याला दुष्काळमुक्त करण्यासाठी आखलेली योजना आहे. परंतु जिल्ह्यातील जनतेकडून उत्स्फूर्त प्रतिसाद न लाभल्याने या योजनेची कासवगतीने वाटचाल सुरु आहे.

Tanker emancipation can be possible in case of a manipulator | जलयुक्त शिवार लोकचळवळ झाल्यास टँकरमुक्ती शक्य

जलयुक्त शिवार लोकचळवळ झाल्यास टँकरमुक्ती शक्य

Next
ठळक मुद्देजलस्रोतांनी गाठली धोक्याची पातळी : तलावांच्या जिल्ह्यात पाणी टंचाईचे सावट

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : मुख्यमंत्री फडणवीस यांच्या संकल्पनेतून साकारलेली जलयुक्त शिवार योजना महत्वाकांक्षी व राज्याला दुष्काळमुक्त करण्यासाठी आखलेली योजना आहे. परंतु जिल्ह्यातील जनतेकडून उत्स्फूर्त प्रतिसाद न लाभल्याने या योजनेची कासवगतीने वाटचाल सुरु आहे.
संपूर्ण महाराष्ट्रात पाणी फाऊंडेशन, शासन आणि जनतेच्या मदतीने मराठवाड्यासह, दुष्काळी भागात लोकसहभागातून मोठ्या प्रमाणात पाणी अडवण्यासाठी लोकचळवळ सुरु आहे. सरकारच्या मदतीने जनता काम करीत आहेत. भविष्यात होणाऱ्या पाणी टंचाईवर मात करण्यासाठी जलयुक्त शिवार ही लोकचळवळ झाल्याशिवाय जलस्त्रोतांमध्ये वाढ होणार नाही. दुष्काळ हटविण्यासाठी शासनाकडून अनेक प्रयत्न होत असले तरी जिल्हावासीयांकडून याला अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही. आताही मानसिकता बदलण्याची गरज निर्माण झाली आहे. वाढते तापमान, अनियमित पर्जन्यमान व त्याचा शेती क्षेत्रावर होणारा परिणाम या सर्व बाबींचा विचार करता पाणी टंचाईवर मात करण्यासाठी व वृक्ष लागवडीसाठी अनेक सामाजिक संस्था, डॉक्टर, विद्यार्थी व शाळा कॉलेजासह सर्वसामान्य जनतेने यासाठी दृढसंकल्प करणे गरजेचे आहे.
अनेक वर्षांपासून शासन जलसंधारणाचे काम करीत आहे. मात्र अद्यापही पाणी टंचाईवर मात करता आली नाही. त्यामुळे ही जनचळवळ होऊन गावागावात शासन व जनतेच्या मदतीने अनेक सामाजिक संस्थांच्या श्रमदानातून जलसंधारणासाठी नदी-नाले, तळे खोलीकरणाची कामे झाली पाहिजेत. जी गावे पाण्यासाठी एकी दाखवून एकत्र आले त्या गावांचा आज चेहरामोहराच बदलून गेला आहे. राज्यात अनेक ठिकाणी पाणी फाऊंडेशन, वॉटर कप स्पर्धेतून अनेक तालुक्यांमध्ये ओढे, नाले, तळी यांचे रुंदीकरण व खोलीकरणाची कामे युध्दपातळीवर सुरु आहेत.
पाण्यासाठीची ही चळवळ लोकचळवळ झाली तरच शेतकºयांच्या माथी असलेला दुष्काळाचा (पाण्याचा) कलंक पुसला जाईल. जलयुक्त शिवारची कामे झाल्यास आज बोअरवेलची वाढणारी स्पर्धा, जिल्ह्यात असणाºया विहिरींच्या पाणी पातळीत वाढ होईल. त्याचा फायदा पिकांना झाल्यास शेतकºयांच्या उत्पन्नात वाढ होईल. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटेल. जलसाठ्याचे रुंदीकरण, खोलीकरण झाल्यास पाणी पावसाळ्यात वाहून न जाता जलसाठ्यात साठून राहणार आहे. याचा फायदा निश्चितच आसपासच्या शिवारातील लोकांना होणार आहे.
पावसाचे प्रमाण दिवसेंदिवस कमी होत चालल्याने नैसर्गिक तलाव, बोड्या जानेवारी महिन्यातच कोरड्या पडतात. उन्हाळ्यात पाण्यासाठी दाही दिशा भटकण्याची वेळ नागरिकांवर येते. खंड पडणाºया पावसामुळे रोवणीचा हंगाम लोटला तरी रोवणीसाठी पुरेसे पाणी मिळत नाही. पाण्याचा दुष्काळ संपविण्याची क्षमता जलयुक्त शिवार योजनेत आहे. फक्त या योजनेसाठी लोकचळवळ होणे गरजेचे आहे. तसे झाल्यास श्रमदानामुळे गावे पाणीदार होतील. त्यामुळे दुष्काळाची चिंता जाणवणार नाही. शहराला पिण्याच्या पाण्यासाठी मोठी किंमत मोजावी लागत आहे. जलयुक्त शिवार लोकचळवळ झाल्यास शहराजवळील ओढे, नाले, तलाव व विहिरींचे खोलीकरण व रुंदीकरण करुन पाणी अडवा, पाणी जिरवा ही मोहीम सर्वस्तरातून राबविल्यास शहराला भेडसावणाºया पाणी समस्येला तोंड द्यावे लागणार नाही. पाणी पातळीत वाढ होईल. शहरवासीयांची पाणी समस्या मिटविण्यासाठी नगरपरिषदेसह, शहरवासीयांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही. पण आता ही मानसिकता बदलून पाण्यासाठी एकवटलेच पाहिजे अन्यथा भविष्यात पाण्यासाठी फार मोठी किंमत मोजावी लागेल.

Web Title: Tanker emancipation can be possible in case of a manipulator

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.