तंटामुक्त समितीने लावले शुभमंगल
By admin | Published: July 7, 2016 02:01 AM2016-07-07T02:01:07+5:302016-07-07T02:01:07+5:30
स्थानिक निवासी नंदिनी सुकचंद टेंभरे व दहेगाव (मानेगाव) येथील रहिवासी विजयकुमार पटले यांचे प्रेमसंबंध मागील दीड वर्षापासून सुरू होते.
बोरकन्हार : येथील महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीने दोन प्रेमी युगलांचा शुभमंगल घडवून आणला.
स्थानिक निवासी नंदिनी सुकचंद टेंभरे व दहेगाव (मानेगाव) येथील रहिवासी विजयकुमार पटले यांचे प्रेमसंबंध मागील दीड वर्षापासून सुरू होते. परंतु दोन्ही कुटुंबाकडील काही समस्या निर्माण झाल्यामुळे त्यांच्या लग्नाविषयी संभ्रम निर्माण झाला होता. याचे निराकरण करण्याचे येथील तंटामुक्त समितीने ठरविले. दोन्ही पक्षाकडील मंडळींना एकत्र बोलाविण्यात आले. आपसातील मतभेद मिटवून प्रेमीयुगलांचे शुभमंगल करण्यास तडजोळ घडवून आणण्यात आला. मंगलाष्टके बोलून तंटामुक्त समितीच्या कार्यालयात लग्न लावण्यात आले. समितीकडून नवरी मुलीला नवीन साडी, लग्नाचे सर्व साहित्य आणि गृहोपयोगी भांडी देण्यात आली.
या लग्न सोहळ्यासाठी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष अनिल हुकरे, सरपंच ज्योती शहारे, भोजराज ब्राम्हणकर, पोलीस पाटील तिलकचंद कवरे, अनिल शहारे, सुरेश मटाले, एकनाथ खापर्डे, सुकदेव हुकरे, मानसिंग पटले, धमेंद्र असाटी, झुमकलाल चौधरी, सुरेखा पटले, रामलाल बागडे व उल्हास तुरकर यांनी सहकार्य केले. (वार्ताहर)