तंंटामुक्त गावे फक्त फलकापुरतीच सिमित
By admin | Published: May 12, 2017 01:20 AM2017-05-12T01:20:37+5:302017-05-12T01:20:37+5:30
गावातील तंटे गावातच सामोपचाराने सोडविण्यासाठी राज्य सरकारने १५ आॅगस्ट२००७ पासून महात्मा गांधी तंटामुक्त गाव
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : गावातील तंटे गावातच सामोपचाराने सोडविण्यासाठी राज्य सरकारने १५ आॅगस्ट२००७ पासून महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियान सुरू केला. या अभियानाला उदंड प्रतिसाद मिळाला. राज्यात आतापर्यंत १८ हजारापेक्षा अधिक गावे तंटामुक्त घोषीत करण्यात आले आहेत. या प्रत्येक गावातील तंटामुक्त अभियानाचे फलक लोकांना प्रेरणादायी ठरत होते. आता तंटामुक्त गावातही वाद उदभवू लागले आहेत.
राज्यातील प्रत्येक गावात महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीमेचे फलक दिसते. फलक लावल्याने गावाला प्रतिष्ठा मिळते. व मोहीमेला वृंध्दीगंत करण्याची प्रेरणा मिळते. हा उद्देश समोर ठेवून प्रचार प्रसिध्दीच्या रकमेतून फलक गावातील लोकांना प्रेरणादायी ठरावेत यासाठी गावाच्या प्रवेशाच्या ठिकाणी हे फलक लावण्यात आले आहेत. पुरस्कार प्राप्त गाव समित्या जूने वाद मिटवून नवी वाद उदभवणार नाही याकडे विशेष लक्ष देते.
समाजात शांतता व सुव्यवस्था प्रस्तापित व्हावी, यासाठी राज्य सरकारने ही मोहीम अंमलात आणली. पुरस्कार प्राप्त गांवात तंटामुक्तीचे फलक गावाच्या दर्शनी भागात लावण्यात यावे, अश्या सूचना देण्यात आल्या होत्या.
त्यामुळे गोंदिया जिल्ह्यातील प्रत्येक गावात फलक दर्शनिय स्थळी लावण्यात आले. या फलकांना लावण्यासाठी येणारा खर्च पुरस्काराच्या राशीतून करण्यात यावा असे सूचविण्यात आले.
जिल्ह्यातील ५५६ गावे तंटामुक्त पुरस्कार प्राप्त आहेत. तंटामुक्ती तर्फे दारूबंदीचे प्रयत्न केले जात आहेत. तंटामुक्त मोहीम अंमलात आणण्यापुर्वी गावागावात दारूचा महापूर वाहायचा. तेव्हा दारुबंदी करण्यासाठी झटणाऱ्या महिलांना अपयश येत होते. परंतु महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम अंमलात आल्याबरोबर गावागावातील दारूबंदी समितीला पाठबळ मिळाले. आता गावागावात अवैध दारूविक्रीला पायबंद घालण्यासाठी तंटामुक्तीचे प्रयत्न सुरू आहे. परंतु शासानाने परवानाप्राप्त दारू दुकाने बंद केल्याने अवैध दारू विक्री होत आहे.