तालुक्यात तापाची साथ

By admin | Published: September 9, 2014 11:47 PM2014-09-09T23:47:31+5:302014-09-09T23:47:31+5:30

तालुक्यातील जनतेच्या आरोग्याची काळजी घेणाऱ्या ग्रामीण रुग्णालयात तापाच्या साथीमुळे सध्या रुग्णांची गर्दी पाहावयास मिळत आहे.

Tapachi companions in the taluka | तालुक्यात तापाची साथ

तालुक्यात तापाची साथ

Next

सडक/अर्जुनी : तालुक्यातील जनतेच्या आरोग्याची काळजी घेणाऱ्या ग्रामीण रुग्णालयात तापाच्या साथीमुळे सध्या रुग्णांची गर्दी पाहावयास मिळत आहे.
सध्या ताप, विषमज्वर, खोकला, मलेरिया, डेंग्यू यासारख्या आजारांनी तालुक्यातील गावे फनफनत असल्याचे चित्र दिसत आहे. ग्रामीण रुग्णालयात दररोज २९५ रुग्णांची तपासणी केली जात आहे. या रुग्णालयात तीन डॉक्टरांची नियुक्ती करण्यात आली आहे.
सीबीसी कॉन्टर मशीनद्वारे रुग्णांची तपासणी केली जात आहे. ही सीबीसी मशीन गोंदिया जिल्ह्यात फक्त दोन ठिकाणी असल्याची माहिती प्रयोगशाळा कर्मचाऱ्यांनी दिली. ही मशिन गोंदिया व सडक/अर्जुनी या दोनच तालुक्याला उपलब्ध करून देण्यात आली आहे. यामुळे रुग्णांची वेळीच तपासणी करण्यासाठी सोयिस्कर होत आहे.
सडक/अर्जुनी ग्रामीण रुग्णालयात ईसीजी मशीन नसल्यामुळे रुग्णांना साकोली, गोंदिया, नागपूर यासारख्या ठिकाणी जावून तपासणी करावी लागत आहे. गेल्या एप्रिल महिन्यापासून स्त्री व पुरुष नसबंदी शस्त्रक्रिया करणे बंद असल्याची माहिती रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी दिली. रुग्णालयाचे जबाबदार डॉ. नंदेश्वर यांना कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेविषयी अधिक माहिती देताना सांगितले की, यावर्षी फक्त पाच शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. नसबंदी शस्त्रक्रिया करण्यात सडक/अजुनीचे ग्रामीण रुग्णालय जिल्ह्यात मागे असल्याचे ते म्हणाले.
दररोज ११५ ते १२० रुग्णांची मलेरिया व ५० ते ६० रुग्णांची विषमज्वर या आजाराची रक्त तपासणी केल्या जात आहे. सदर रक्त तपासणीसाठी १२० ते १०० रुपये घेतले जात आहेत. या ग्रामीण रुग्णालयात काही वर्षापासून असलेले कर्मचारी आलेल्या रुग्णांशी असभ्य वर्तणूक करताना दिसतात. त्या कर्मचाऱ्यांनी सभ्यतेने वागावे यासाठी संबंधित डॉक्टरांनी लक्ष देऊन कर्मचाऱ्यांवर वचक ठेवणे तेवढेच गरजेचे आहे. सध्या वातावरण खराब असल्यामुळे अनेक गावातील घराघरांत तापाची साथ पहावयास मिळत आहे.
तालुक्यातील बकी, पिपरी, राका, चिखली, खोबा या गावात डेंगूचे रुग्ण आढळल्याची माहिती आहे. पण आरोग्य विभागाने पाहिजे तशी उपाययोजना केल्याचे दिसत नाही. तरी जिल्हा आरोग्य अधिकारी व शल्यचिकित्सकांनी लक्ष देऊन जनतेच्या आरोग्याची काळजी घ्यावी, अशी मागणी होत आहे. तालुक्यातील १०८ गावांचे मुख्य ग्रामीण रुग्णालय आहे. पण या ठिकाणी एक्स-रे मशीन नाही. रुग्णालयाच्या बाजूला रुग्णांनी केलेली घान नेहमीच पहावयास मिळते.
जेवणाचे उर्वरित अन्न व खराब रिकाम्या पॉलिथिन या सडक्या स्थितीत पडल्या आहेत. पण संबंधित डॉक्टरांनी लक्ष दिले नाही. ग्रामीण रुग्णालय परिसर हा स्वच्छ व सुंदर दिसण्यासाठी प्रयत्न केले जात नाही. त्यामुळे रुग्णांचे आरोग्य चांगले राहू शकेल. येथील अस्वच्छतेविषयी संबंधित जबाबदार अधिकाऱ्यांनी परिसर स्वच्छ करण्याची तंबी कर्मचाऱ्यांना देणे गरजेचे आहे.
खोडशिवणी प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी सुटीवर गेल्याने तेथील परिसरातील रुग्णांची गैरसोय होताना दिसत आहे. वैद्यकीय अधिकाऱ्याला जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी अशास्थितीत अधिक दिवसांची सुटी कशी दिली, असा प्रश्न उभा आहे. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Tapachi companions in the taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.