शेतकरी विरोधी सरकारला मतपेटीतून धडा शिकवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2019 09:49 PM2019-04-07T21:49:55+5:302019-04-07T21:51:13+5:30
भाजप सरकारच्या कार्यकाळात शेतकऱ्यांच्या सर्वाधिक आत्महत्या झाल्या आहेत. शेतकऱ्यांसाठी फसव्या कर्जमाफी योजनेची घोषणा करुन भाजप सरकार स्वत:ला शेतकऱ्यांच्या कैवारी असल्याचे सांगत आहे. मागील पाच वर्षांत गरीबी, बेरोजगारी आणि महागाईत प्रचंड वाढ झाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : भाजप सरकारच्या कार्यकाळात शेतकऱ्यांच्या सर्वाधिक आत्महत्या झाल्या आहेत. शेतकऱ्यांसाठी फसव्या कर्जमाफी योजनेची घोषणा करुन भाजप सरकार स्वत:ला शेतकऱ्यांच्या कैवारी असल्याचे सांगत आहे. मागील पाच वर्षांत गरीबी, बेरोजगारी आणि महागाईत प्रचंड वाढ झाली आहे.त्यामुळे अशा शेतकरी विरोधी सरकारला मतपेटीतून धडा शिकवा, असे प्रतिपादन वर्षा पटेल यांनी केले.
काँग्रेस-राष्टÑवादी काँग्रेस व महाआघाडीचे उमेदवार नाना पंचबुध्दे यांच्या निवडणूक प्रचारार्थ अर्जुनी मोरगाव तालुक्यातील इसापूर,इटखेडा येथे आयोजित प्रचार सभेला संबोधित करताना ते बोलत होते.
वर्षा पटेल म्हणाल्या, गोंदिया व भंडारा जिल्ह्यात मागील पाच वर्षांत जिल्ह्यात एकही मोठा उद्योग आला नाही. त्यामुळे बेरोजगारीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. सत्तेवर येण्यापूर्वी भाजप सरकारने जनतेला मोठ मोठी आश्वासने दिली होती. मात्र सत्तेवर येताच यासर्व आश्वसनाचा भाजप सरकारला विसर पडला आहे. त्यामुळे अशा खोटारड्या सरकारला त्यांची योग्य जागा दाखवून देण्याची हीच योग्य वेळ असल्याचे सांगितले.गोसेखुर्दसारखा महत्त्वपूर्ण सिंचन प्रकल्प सुध्दा भाजप सरकारच्या काळात रखडला आहे. परिणामी शेतकºयांना सिंचनापासून वंचित राहावे लागत आहे. त्यामुळे शेतकरी हितैशी असल्याचा दावा करणाºया भाजप सरकारचा खरा चेहरा पुढे आला आहे. त्यामुळे अशा विश्वासघाती सरकारला धडा शिकविण्याचे आवाहन केले. महाआघाडीचे उमेदवार नाना पंचबुध्दे यांच्या पाठीशी उभे राहण्याचे आवाहन केले. तर काँग्रेसचे अर्जुनी मोरगाव विधानसभा प्रमुख रत्नदीप दहीवले यांनी मागील पाच वर्षांत भाजप सरकारने केवळ मोठी आणि खोटी आश्वासने देण्यापलिकडे काहीच केले नाही. त्यामुळे अशा खोटारड्या सरकारला मतपेटीतून धडा शिकविण्यास सांगितले.