जनतेचा विश्वासघात करणाऱ्यांना धडा शिकवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2018 12:38 AM2018-05-19T00:38:34+5:302018-05-19T00:38:34+5:30

केंद्र व राज्यात जनतेला मोठी आश्वासन देऊन सत्तेवर आलेल्या भाजपा सरकारने मागील चार वर्षांत कुठलेच ठोस काम केले नाही. केवळ विविध योजनांची नाव बदलविण्यापलीकडे काहीच केले नाही. महागाई नियंत्रणात आणू, रोजगार देऊ, शेतकऱ्यांच्या हिताच्या योजना राबविणार अशी मोठी आश्वासने दिली.

Teach a lesson to the betrayers of the people | जनतेचा विश्वासघात करणाऱ्यांना धडा शिकवा

जनतेचा विश्वासघात करणाऱ्यांना धडा शिकवा

googlenewsNext
ठळक मुद्देप्रफुल्ल पटेल : तिरोडा तालुक्यात प्रचार सभा, पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये उत्साह

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : केंद्र व राज्यात जनतेला मोठी आश्वासन देऊन सत्तेवर आलेल्या भाजपा सरकारने मागील चार वर्षांत कुठलेच ठोस काम केले नाही. केवळ विविध योजनांची नाव बदलविण्यापलीकडे काहीच केले नाही. महागाई नियंत्रणात आणू, रोजगार देऊ, शेतकऱ्यांच्या हिताच्या योजना राबविणार अशी मोठी आश्वासने दिली. मात्र प्रत्यक्षात यापैकी कुठल्याच आश्वासनाची पूर्तता केली नाही.जनतेचा विश्वासघात करणाऱ्या सरकारला धडा शिकवा, असे आवाहन खा. प्रफुल्ल पटेल यांनी केले.
काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, रि.पा., पि.रि.पा.चे अधिकृत उमेदवार मधुकर कुकडे यांच्या निवडणूक प्रचारार्थ तिरोडा तालुक्यात आयोजित प्रचार सभेला संबोधित करताना ते बोलत होते. या वेळी माजी. आ. दिलीप बन्सोड, माजी जि.प.उपाध्यक्ष रमेश पारधी, तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राधेलाल पटेल, सचिव डॉ.योगेंद्र भगत, माजी. जि.प.उपाध्यक्ष पंचभाऊ बिसेन, रॉका महिला जिल्हाध्यक्ष राजलक्ष्मी तुरकर, तालुकाध्यक्ष प्रेमकुमार रहांगडाले, डॉ. अविनाश जायस्वाल, जि.प.सदस्य कैलास पटले, प.स.सदस्य किशोर पारधी, नत्थुलाल अंबुले, माया भगत, सरपंच समिक बन्सोड, अलकेश मिश्रा, इंदीेरा अंबुले उपस्थित होते. खा. पटेल म्हणाले ही निवडणूक सर्व सामान्य जनता, विकासापासून वंचित समाजाला त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी आहे. सर्व सामान्य जनतेची दिशाभूल करुन सत्तेवर आलेल्या सरकारला त्यांची जागा दाखवून देशात परिवर्तन आणण्याचे आवाहन केले. निवडणुकीत केवळ मोठी आणि खोटी आश्वासने देण्याशिवाय या सरकारकडे काहीच नाही. त्यामुळे या क्षेत्राच्या सर्वांगिन विकासासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, रि.पा., पि.रि.पा.चे अधिकृत उमेदवार मधुकर कुकडे यांना साथ देण्याचे आवाहन केले. माजी.आ.बन्सोड यांनी मागील चार वर्षांत भंडारा-गोंदिया जिल्ह्यात एकही मोठेही काम झाले नाही. सिंचन प्रकल्प मार्गी लागले नाही. उलट रोजगाराची समस्या निर्माण झाली असून जनतेला विविध समस्यांना तोड द्यावे लागत आहे. त्यामुळे अशा सरकारला धडा शिकविण्याची हीच खरी संधी असल्याचे सांगत आघाडीच्या उमेदवाराला साथ देण्याचे आवाहन केले. उपस्थित अन्य मान्यवरांनी यावेळी सभेला संबोधित केले. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, रि.पा., पि.रि.पा.चे अधिकृत उमेदवार मधुकर कुकडे यांच्या प्रचारार्थ खा.पटेल यांनी अर्जुनी, पालडोंगरीे, कवलेवाडा, मुंडीकोटा, नवेझरी, वडेगाव, सुकडी येथे सभा घेतल्या.

Web Title: Teach a lesson to the betrayers of the people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.