युती सरकारला धडा शिकवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2018 10:04 PM2018-11-11T22:04:46+5:302018-11-11T22:07:44+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : जिल्ह्यातील ४० हजार शेतकऱ्यांचे कर्ज अद्यापही माफ झाले नाही. वेळेवर कर्ज न मिळाल्याने शेतकºयांना ...
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : जिल्ह्यातील ४० हजार शेतकऱ्यांचे कर्ज अद्यापही माफ झाले नाही. वेळेवर कर्ज न मिळाल्याने शेतकºयांना नवीन पीक कर्ज मिळण्यापासून वंचित राहावे लागले आहे. तर अकाली पावसामुळे नुकसान होवून देखील शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ मिळाला नाही.
केंद्र व राज्यातील भाजपा शिवसेना युती सरकारने केवळ शेतकऱ्यांना मोठी आश्वासने देवून त्यांची दिशाभूल करण्याचे काम केले. हे सरकार शेतकरी हिताचे नसून उद्योजकांच्या हिताचे आहे. त्यामुळे या भाजपा सरकारला जनतेनेच धडा शिकवावा, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रतिनिधी मनोहर चंद्रिकापुरे यांनी केले.
तालुक्यातील भंडगा येथे आयोजित नाटकाच्या उद्घाटन कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. या वेळी शिक्षण विस्तार अधिकारी महेंद्र मोटघरे, डुमेश चौरागडे,अविनाश बिसेन, लक्ष्मण चंद्रिकापुरे, शिवाजी ईश्वार, राकेश बघेले, सरपंच सोमेश रहांगडाले,संजूबाई बडोले, रजनी दमाहे, एन.के. बघेले, खोमेश टेंभरे उपस्थित होते.
चंद्रिकापुरे म्हणाले, राज्य सरकारने जलयुक्त शिवार योजनेचा गाजावाजा केला. परंतु प्रत्यक्षात कुठेही सिंचनाची सोय उपलब्ध करु न देण्यात आली नाही.
युवकांना वर्षाला २ कोटी नोकऱ्या देण्याचे आश्वासन देवून सुद्धा आतापर्यंत केवळ ६ लाख युवकांना रोजगार देण्यात आला. प्रत्यक्षात ८ कोटी बेरोजगारांना रोजगार उपलब्ध व्हायला पाहिजे होता. त्यामुळे दिवसेंदिवस बेरोजगारीचे प्रमाण वाढतच चालले आहे. शेतकरी आपल्या तरु ण मुलांना शिक्षण देण्यासाठी जिवाचे रान करतात व त्यांच्या वृद्धपकाळात मदत होईल असे स्वप्न बघतात.मात्र मोदी सरकारने बेरोजगारांना रोजगार देण्याऐवजी त्यांचा रोजगार हिरावण्याचे काम करीत आहे.त्यामुळे अशा विश्वासघातकी सरकारला धडा शिकविण्याचे आवाहन केले.
संचालन उमाकांत मोटघरे यांनी केले तर आभार दिलिप खोब्रागडे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मोहन शरणागत, भरत दमाहे, लालचंद खोब्रागडे, मीताराम कवास, भरत भोयर, राकेश मस्करे,गुन्नीलाल नंदेश्वर देवाजी मांढरे, राकेश मस्करे व मंडळाच्या सदस्यांनी सहकार्य केले.