खोटे आश्वासन देणाऱ्यांना धडा शिकवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2018 08:45 PM2018-12-27T20:45:39+5:302018-12-27T20:46:05+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क अर्जुनी-मोरगाव : केंद्र व राज्यात सत्तारुढ असलेले भाजप सरकार हे खोटारडे आहे. निवडणुकांपूर्वी दिलेली आश्वासने त्यांनी ...

Teach a lesson to false assurances | खोटे आश्वासन देणाऱ्यांना धडा शिकवा

खोटे आश्वासन देणाऱ्यांना धडा शिकवा

Next
ठळक मुद्देबाबा कटरे : अर्जुनी मोरगाव तहसील कार्यालयावर शेतकऱ्यांचा मोर्चा, धानाला २५०० रुपये हमीभाव द्या

लोकमत न्यूज नेटवर्क
अर्जुनी-मोरगाव : केंद्र व राज्यात सत्तारुढ असलेले भाजप सरकार हे खोटारडे आहे. निवडणुकांपूर्वी दिलेली आश्वासने त्यांनी पाळली नाहीत.उद्योगपतींचे दलाल आहेत. उद्योगपती हित जोपासण्यासाठी योजना तयार करुन सर्वसामान्यांची लुबाडणूक केली जात आहे. शेतकरी विरोधी असलेल्या भाजप सरकारला येत्या निवडणुकांमध्ये धडा शिकवा असे आवाहन काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम (बाबा) कटरे यांनी केले.
अर्जुनी मोरगाव तालुका काँग्रेसतर्फे गुरूवारी (दि.२७) आयोजित शेतकरी आक्रोश मोर्च्याला संबोधित करताना ते बोलत होते. या मोर्चाची सुरुवात दुर्गा चौक येथून झाली. मोर्चात तालुक्यातील खेड्यापाड्यातून आबालवृद्ध, महिला पुरुष उपस्थित झाले होते. हा मोर्चा मुख्य रस्त्याने मार्गक्रमण करीत तहसील कार्यालयावर जाऊन धडकला. यानंतर मोर्चाचे रुपांतर सभेत झाले. या वेळी कार्यकर्त्यांनी सत्तारुढ भाजप सरकारला भाषणातून चांगलेच धारेवर धरले. कटरे म्हणाले, भाजप सरकार हे शेतकरी विरोधी आहे. शेतकºयांच्या शेतमालाला योग्य भाव नाही. कर्जमाफीचे तुणतुने वाजविण्यात आले. मात्र अद्याप बºयाच शेतकºयांना कर्जमाफी मिळाली नाही. अशिक्षीत शेतकऱ्यांना आॅनलाईन पद्धतीने कर्जमाफीचे फार्म भरण्यास बाध्य केले. बिचारे शेतकरी दाम्पत्य आपले कामधंदे सोडून फार्म भरण्यासाठी उन्हातान्हात, रात्रीबेरात्री उभे असायचे, आॅनलाईन फार्म भरुन देणाºयांचेही चांगभले झाले. महिलांना चुल फुंकून फुफ्सुसाचे आजार होऊ नयेत, यासाठी उज्वला गॅसचे वितरण केले. काँग्रेसच्या राजवटीत स्वस्त असलेल्या गॅस सिलेंडरचे भाव गगनाला भिडले. मोफत गॅस कनेक्शन देण्याचा कांगावा करुन क्रमाक्रमाने त्यांच्या सवलतीचे पैसे गॅसची किंमत म्हणून वसूल केली जात आहे.
एकंदरित हे शासन उद्योगपतींने दलाल आहे. नुकत्याच पाच राज्यात निवडणुका पार पडल्या. त्या जनतेने काँग्रेसला कौल दिला. यावरुन सत्तारुढ शासनाला सर्वसामान्य जनता कंटाळली आहे असे लक्षात येते. याचाच कित्ता गिरवत भाजपला हद्दपार करण्याचे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले. या वेळी भागवत नाकाडे, अमर वऱ्हाडे, प्रमोद लांजेवार, उषा श्हारे यांनी मार्गदर्शन केले.या वेळी विविध मागण्यांचे निवेदन शिष्टमंडळाच्या वतीने तहसीलदार धनंजय देशमुख यांना देण्यात आले.
अन् लोकनेते आलेच नाही
माजी खासदार नाना पटोले यांनी भाजपला रामराम ठोकल्यानंतर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. काँग्रेसमध्ये नवचैतन्य आले. काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी त्यांची कदर करत त्यांना किसान काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्षपद बहाल केले. त्यामुळे आपल्या लोकप्रिय शेतकरी नेत्याविषयी स्थानिक शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या. त्यांच्या नावावर येथे शेतकऱ्यांनी मोठी गर्दीॅ केली होती. ते या मोर्चाचे नेतृत्व करणार होते. मात्र ते न आल्याने शेतकऱ्यांचा भ्रमनिराश झाला. महारणा प्रताप चौकात मोर्चा येताच शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. आधी नाना पटोलेंना मोर्चात बोलवा अशी मागणी शेतकरी करीत होते.
या आहेत प्रमुख मागण्या
शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्यात यावी, धानाला २५०० रुपये हमीभाव, बेरोजगारांच्या हाताला काम, शासकीय कार्यालयातील रिक्त पदांची भर्ती, शेतमजुरांसाठी रोजगार निर्मिती, शेतकºयांचे वीज बिल माफ, धानाला प्रती क्विंटल ४०० रुपये तातडीने बोनस जाहीर करा, महिला बचत गटांना शुन्य टक्के व्याजाने कर्ज, नोंदणीकृत कामगारांना विविध शासकीय योजनांचा लाभ, वनहक्काचे सामूहिक व वैयक्तिक पट्टे त्वरित देण्यात यावे, गरजुंना प्रधानमंत्री आवास योजना व घरकुलाचा लाभ त्वरित देण्यात यावा, तुडतुडा व दुष्काळी लाभ त्वरित देण्यात यावा, इटियाडोह धरण लाभ क्षेत्रातील रब्बी पिकासाठी सिंचनाची व्यवस्था उपलब्ध करुन द्यावी, एस.सी.एस.एस.टी.,ओबीसी विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती त्वरित त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात यावी, मासेमारी करणाऱ्या संस्थांची तलावाची लिज माफ करण्यात यावी, हमीभाव केंद्रावर सुरु असलेली शेतकºयांची लूट थांबविण्यात यावी, स्वमाीनाथन आयोगाच्या शिफारसी लागू कराव्या, घरकुल लाभधारकांना स्वस्त दरात रेती उपलब्ध करुन द्यावी, वर्ग २ च्या जमिनी वर्ग १ मध्ये रुपांतरीत करण्याच्या प्रक्रियेची अंमलबजावणी त्वरित करावी, सुशिक्षीत बेरोजगार तरुणांना ४ हजार बेरोजगारी भत्ता देण्यात यावा, महिला बचत गटांचे कर्जमाफ करण्यात यावे आदी मागण्यांचा समावेश होता.

Web Title: Teach a lesson to false assurances

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.