जनतेची दिशाभूल करणाऱ्यांना धडा शिकवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2018 08:32 PM2018-12-27T20:32:38+5:302018-12-27T20:32:54+5:30

शेतकरी तसेच सर्व सामान्यांना दिलासा देणाऱ्या अनेक योजना राबविण्याचे आश्वासन देत केंद्र आणि राज्यात भाजपा सरकार सत्तेवर आले. मात्र सत्तेवर येताच सरकारला जनतेला दिलेल्या आश्वासनांचा विसर पडला आहे. शेतकरी व जनहित विरोधी धोरणामुळे जनतेचे हाल होत आहे. केवळ अच्छे दिन चे स्वप्न दाखवून जनतेची दिशाभूल करणाºया सरकारला त्यांची जागा दाखवून देण्याचे आवाहन माजीे खा. नाना पटोले यांनी केले.

Teach a lesson to misleading the people | जनतेची दिशाभूल करणाऱ्यांना धडा शिकवा

जनतेची दिशाभूल करणाऱ्यांना धडा शिकवा

googlenewsNext
ठळक मुद्देनाना पटोले : बाम्हणी येथे काँग्रेस कार्यकर्ता मेळावा

लोकमत न्यूज नेटवर्क
शेंडा (कोयलारी) : शेतकरी तसेच सर्व सामान्यांना दिलासा देणाऱ्या अनेक योजना राबविण्याचे आश्वासन देत केंद्र आणि राज्यात भाजपा सरकार सत्तेवर आले. मात्र सत्तेवर येताच सरकारला जनतेला दिलेल्या आश्वासनांचा विसर पडला आहे. शेतकरी व जनहित विरोधी धोरणामुळे जनतेचे हाल होत आहे. केवळ अच्छे दिन चे स्वप्न दाखवून जनतेची दिशाभूल करणाºया सरकारला त्यांची जागा दाखवून देण्याचे आवाहन माजीे खा. नाना पटोले यांनी केले.
सडक अजुनी तालुक्यातील बाम्हणी खडकी येथे शेंडा जि.प.क्षेत्राच्या वतीने काँग्रेस कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी ते बोलत होते. मेळाव्याचे उद्घाटन माजी आ. रामरतन राऊत यांच्या हस्ते करण्यात आले.
या वेळी जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष आलोक मोहंती, तालुकाध्यक्ष शेषराव गिऱ्हेपुंजे, तालुका महिला काँग्रेसच्या अध्यक्ष गायत्री इरले, युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष निशांत राऊत, शिक्षण सभापती रमेश अंबुले, सभापती लता दोनोडे, जि.प.सदस्य सरिता कापगते, रत्नदीप दहिवले, जागेश्वर धनबाते, जिल्हा महिला काँग्रेस अध्यक्ष उषा शहारे, कृपासागर जनबंधू, युवा संकल्पचे संतोष वालदे, विलास कापगते, प्रकाश पुराम, मार्कंड परिहार, साधू लिल्हारे, हरिष तोडसकर, नितीन भालेराव, सरपंच सिंधू बारसागडे, दिपा गहाणे, प्रकाश मडावी, मोहन सुरसाऊत, माणिक घनाडे, पुष्पा खोटेले, भरत मडावी, जगदीप खंडाते, अंताराम मडावी उपस्थित होते. पटोले म्हणाले, केंद्र आणि राज्यातील सरकारला चार वर्षांचा कार्यकाळ लोटूनही सुशिक्षित बेरोजगार, शेतकरी, शेतमजूर व छोट्या व्यावसायीकांना दिलासा मिळाला नाही. उलट त्यांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. जी.एस.टी.,नोटबंदी सारख्या अडचणींना गोरगरीबांना सामोरे जावे लागले.
पेट्रोल, डिझेलच्या किमती वाढवून जनतेची लूट केली जात आहे. शेतकºयांना सरळ मार्गाने कर्जमाफी न देता आॅनलाईनचा तिढा समोर करुन सरकारने जनतेची आर्थिक पिळवणूक करीत आहे. तर कर्जमाफीचा घोळ अद्यापही संपलेला नसून शेतकरी अजुनही कर्जमाफीपासून वंचित आहेत. एकट्या महाराष्ट्रात मागील चार वर्षात बारा हजार शेतकºयांनी आत्महत्या केल्या आहेत.चारशे रुपयाचा गॅस सिलेंडर हजार रुपयांवर पोहचला आहे. स्वस्त धान्य दुकानातून गोरगरिबांना मिळणारे रॉकेल सुध्दा मिळणे बंद झाल्याने त्यांना अंधारात रात्र काढावी लागत आहे. त्यामुळे जनतेच्या भावनांशी खेळणाºया सरकारला जनतेची धडा शिकविण्याची गरज असल्याचे पटोले यांनी सांगितले. या वेळी उपस्थित अन्य मान्यवरांनी मार्गदर्शन केले. या दरम्यान शेंडा जि.प. क्षेत्रांतर्गत येणाºया सरपंच, उपसरपंचाचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी अनेक भाजपा कार्यकर्त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. प्रास्ताविक जि.प.सदस्य सरिता कापगते यांनी मांडले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निशांत राऊत यांनी केले तर आभार विलास कापगते यांनी मानले.

Web Title: Teach a lesson to misleading the people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.