जनतेचा विश्वासघात करणाºयांना धडा शिकवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2017 12:05 AM2017-10-15T00:05:21+5:302017-10-15T00:05:33+5:30
जनतेला अच्छे दिनचे स्वप्न दाखवून सत्तेवर आलेल्या भाजपा सरकारने प्रत्यक्षात मात्र जनतेची दिशाभूल केली. शेतकरी, शेतमजूर आणि सर्व सामान्य नागरिकांना दिलेल्या एकाही आश्वासनाची अद्यापही पूर्तत: केली नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : जनतेला अच्छे दिनचे स्वप्न दाखवून सत्तेवर आलेल्या भाजपा सरकारने प्रत्यक्षात मात्र जनतेची दिशाभूल केली. शेतकरी, शेतमजूर आणि सर्व सामान्य नागरिकांना दिलेल्या एकाही आश्वासनाची अद्यापही पूर्तत: केली नाही. त्यामुळे खोटी आश्वासने देऊन जनतेची दिशाभूल करणाºया सरकारला धडा शिकविण्याचे आवाहन आ.गोपालदास अग्रवाल यांनी येथे केले.
जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमिवर आ.अग्रवाल यांनी तालुक्यात ठिकठिकाणी सभा घेऊन नागरिकांशी संवाद साधत आहे. शनिवारी (दि.१४) तालुक्यातील पठानटोला,गोंडीटोला येथे आयोजित सभेप्रसंगी ते बोलत होते. जिल्हा परिषद अध्यक्षा उषा मेंढे, जि.प.सभापती विमल नागपूरे, पी.जी.कटरे, विजय लोणारे, विठोबा लिल्हारे, रमेश अंबुले, सीमा मडावी, शेखर पटले, पंचायत समिती सभापती माधुरी हरिणखेडे, स्रेहा गौतम, ओमप्रकाश भक्तवर्ती, चमन बिसेन, मनिष मेश्राम, प्रमिला करचाल, निता पटले, विनिता टेंभरे, प्रकाश डहाट, प्रिया मेश्राम, इंद्रायणी धावडे, योगराज उपराडे, अनिल मते, जयप्रकाश बिसेन उपस्थित होते. आ.अग्रवाल म्हणाले, दिल्ली ते गल्लीपर्यंत सरकार चालविण्याचे कौशल्य केवळ काँग्रेसकडे आहे. भाजप नेत्यानी जनतेला मोठी मोठी आश्वासने दिली. मात्र सत्तेवर आल्यानंतर त्यांना या सर्व आश्वासनाचा विसर पडला आहे. याच पक्षाचे नेते आता गावा गावात जाऊन ७० वर्षांत काँग्रेसने काय केले असा सवाल करीत आहे. भाजपा नेत्यांनी सत्तेवर आल्यानंतर केवळ जनतेच्या विकासाऐवजी स्वत:चा विकास केल्याचा आरोप केला.
काँग्रेस सरकारने महिला आणि युवकांच्या समस्यांना नेहमीच प्राधान्य दिले. स्थानिक स्वराज संस्थामध्ये महिलांना ५० टक्के आरक्षण देत त्यांचे सक्षमीकरण करण्याचे काम केले. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधी यांनी माहितीचा अधिकार कायदा लागू करुन जनतेला हक्क मिळवून देण्याचे काम केले. तर भाजपा सरकार केवळ जनतेला केवळ खोटी आश्वासने देण्यात व्यस्त आहे. या परिसरातील सिंचन तसेच शेतकºयांच्या अनेक समस्या मार्गी लावल्या.
यापुढेही या परिसराच्या विकासासाठी आपण कठिबध्द असल्याचे सांगितले. यंदाच्या निवडणुकीपासून सरपंचाची निवड ही थेट जनतेतून केली जाणार आहे. त्यामुळे मतदारांनी योग्य उमेदवाराची निवड करावी. तसेच विकास कामे करणाºयांच्या पाठीशी उभे राहण्याचे आवाहन केले.
तालुक्यात ठिकठिकाणी सभा
जिल्ह्यात १६ आॅक्टोबरला होवू घातलेल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर आ.अग्रवाल यांनी शनिवारी (दि.१४) तालुक्यातील पठानटोला, गोंडीटोला, रतनारा, सालईटोला, धामनगाव, टेमनी, चुलोद बिरसी येथे सभा घेतली. तसेच गावकºयांशी संवाद साधला.