निवडणुकीचे मानधन देण्याची शिक्षक समितीची मागणी
By admin | Published: August 3, 2015 01:27 AM2015-08-03T01:27:10+5:302015-08-03T01:27:10+5:30
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती शाखा सडक-अर्जुनीच्या वतीने नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत काम करणारे मतदान केंद्राध्यक्ष
गोंदिया : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती शाखा सडक-अर्जुनीच्या वतीने नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत काम करणारे मतदान केंद्राध्यक्ष तसेच मतदान अधिकारी यांचे मानधन त्वरित देण्यासंबधी सडक-अर्जुनीचे नायब तहसीलदार पी.आर. अटराये यांना निवेदन देण्यात आले.
या अगोदर आॅगस्ट व सप्टेंबर २०१० मध्ये सडक-अर्जुनी तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत ज्या कर्मचाऱ्यांनी काम केले ते कर्मचारी पाच वर्षाचा कालावधी संपूनसुध्दा मानधनापासून वंचित आहेत.
नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीचे मानधन जवळच्या तालुक्यात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना देण्यात आले. मग सडक-अर्जुनी तालुक्यात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मानधन का देण्यात आले नाही, असा प्रश्न शिक्षकांत निर्माण होऊन निवडणूक यंत्रणेविषयी असंतोष निर्माण होत आहे.
या मागणीला घेऊन महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती शाखा सडक-अर्जुनीच्या वतीने किशोर डोंगरवार, तालुका सरचिटणीस डी.आर. जिभकाटे, तालुकाध्यक्ष डी.एन.बडोले, बालू वालोदे यांच्या नेतृत्वात निवेदन देण्यात आले. मानधन देण्यात आले नाही तर शिक्षक समितीच्या वतीने आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
नायब तहसीलदार पी.आर. अटराये यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन पाठवून समस्या सोडविण्याचा प्रयत्न करू, असे आश्वासन दिले. (तालुका प्रतिनिधी)