शिक्षक सत्कारपासून वंचित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2018 10:12 PM2018-08-27T22:12:49+5:302018-08-27T22:13:04+5:30
विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगीरी केल्याबद्दल जिल्ह्यातील विविध मान्यवरांचा जिल्हा प्रशासनातर्फे स्वातंत्र्यदिनी सत्कार केला जातो. यासाठी सत्कारमूर्तीना रितसर पत्र सुध्दा दिले जाते. मात्र सत्कारमूर्तीमध्ये समावेश असलेल्या एका शिक्षकाला जिल्हा प्रशासनाच्या दुर्लक्षितपणामुळे सत्कारपासून वंचित राहावे लागले.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगीरी केल्याबद्दल जिल्ह्यातील विविध मान्यवरांचा जिल्हा प्रशासनातर्फे स्वातंत्र्यदिनी सत्कार केला जातो. यासाठी सत्कारमूर्तीना रितसर पत्र सुध्दा दिले जाते. मात्र सत्कारमूर्तीमध्ये समावेश असलेल्या एका शिक्षकाला जिल्हा प्रशासनाच्या दुर्लक्षितपणामुळे सत्कारपासून वंचित राहावे लागले.
यंदा १५ आॅगस्टला गोंदिया जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे विविध क्षेत्रात उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल विविध मान्यवरांचा सत्कार पालकमंत्री राजकुमार बडोले यांच्या हस्ते शासकीय ध्वजारोहण कार्यक्रमाप्रसंगी करण्यात आला. या सत्कारमूर्तीमध्ये शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट सेवा दिल्याबद्दल सरस्वती कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य अनिलकुमार मंत्री यांच्याही समावेश होता. परंतु प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे सत्कार असल्याचे अधिकृत पत्र न मिळाल्यामुळे ते या कार्यक्रमास उपस्थित राहू शकले नाही. विशेष म्हणजे सत्काराच्या वेळी त्यांच्या नावाचा नामोल्लेख करण्यात आला. मात्र ते उपस्थित नसल्याने पालकमंत्री बडोले सुध्दा आश्चर्यचकीत झाले. याबाबत लोकमत प्रतिनिधीने प्राचार्य अनिलकुमार मंत्री यांच्याशी संर्पक साधला असता, जिल्हाधिकारी कार्यालयातर्फेे मला अद्यापही अधिकृत पत्र न मिळाल्याने मी कार्यक्रमाला जावू शकलो नाही. तरीही सत्कारमूर्तीमध्ये माझे नाव आहे हे मला समजले व सदर विभागातर्फे माझी निवड केली. याबद्दल मी शतश: आभारी आहे. माझ्या शैक्षणिक सेवेची दखल घेऊन सत्कारसाठी मला पात्र ठरविले हा सत्कार माझा नसून माझ्या संपूर्ण शिक्षक बांधवाचा आहे. शिक्षकांच्या सामूहिक परिश्रमामुळेच मला शैक्षणिक सुविधा करता आली व यशाचा टप्पा गाठता आल्याचे सांगितले.
या प्रकारामुळे जिल्हा प्रशासनाचा गलथान कारभार सुध्दा पुढे आला आहे. या प्रकाराची दखल घेऊन दुर्लक्ष करणाऱ्या संबंधित अधिकाºयांवर जिल्हाधिकारी कारवाई करणार का याकडे लक्ष लागले आहे.