शिक्षक धडकले पंचायत समितीवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2017 12:53 AM2017-07-18T00:53:11+5:302017-07-18T00:53:11+5:30
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती शाखा देवरीचे पदाधिकारी जिल्हा सहसचिव संदीप तिडके यांच्या नेतृत्वात वेतनवाढ व इतर मागण्यांच्या संदर्भात पंचायत समितीवर धडकले.
चुकीची वेतनवाढ : शिक्षक समितीचा पुढाकार, गटशिक्षणाधिकाऱ्यांसह चर्चा
लोकमत न्यूज नेटवर्क
चिचटोला : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती शाखा देवरीचे पदाधिकारी जिल्हा सहसचिव संदीप तिडके यांच्या नेतृत्वात वेतनवाढ व इतर मागण्यांच्या संदर्भात पंचायत समितीवर धडकले. या वेळी शिक्षणाधिकाऱ्यांनी चुकीच्या वेतनवाढी तत्काळ दुरूस्त केल्या जातील, अशी ग्वाही संघटनेला दिली.
पंचायत समिती देवरी अंतर्गत कार्यरत शिक्षकांची वार्षिक वेतनवाढ थांबविण्यात आली होती. तर काहींची वेतनवाढ चुकीची लावण्यात आली होती. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने याची गंभीर दखल घेत शेकडो पदाधिकाऱ्यांसह गटशिक्षणाधिकारी डी.बी. साकुरे यांची भेट घेवून चर्चा केली. त्यावेळी कुणाचीही वेतनवाढ थांबविली जाणार नाही तसेच चुकीच्या वेतनवाढी तत्काळ दुरुस्त केल्या जातील, अशी त्यांनी ग्वाही संघटनेला दिली.
तसेच चटोपाध्यायचे प्रकरणे जि.प. ला तत्काळ पाठविणे, कायम झालेल्या शिक्षकांच्या फरकाची रक्कम अदा करणे, सेवापुस्तक अद्यावत करणे, वैद्यकीय देयके अदा करणे, अर्जित रजा प्रकरणे निकाली काढणे, मदतनीस मानधन व एप्रिलपर्यंतचे शालेय पोषण आहार देयक अदा करणे, उच्च परीक्षा परवानगी प्रकरणे जि.प. कडे पाठविणे, जीपीएफ शेड्युल जि.प. ला पाठविणे, यासह शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांवर गटशिक्षणाधिकारी यांच्यासह चर्चा करण्यात आली. या वेळी त्यांनी सर्व प्रकरणे निकाली काढले जातील, असे आश्वासन संघटनेला दिले.
या वेळी जिल्हा सहसचिव संदीप तिडके, तालुकाध्यक्ष गजानन पाटणकर, सुरेश कश्यप, सरचिटणीस विनोद बहेकार, जी.एम. बैस, दीपक कापसे, एल.यू. तवाडे, रामेश्वर वाघाये, भरत खोब्रागडे, आर.डी. गणवीर, प्रकाश गावळकर, संदीप खेडीकर, अरूण सावरकर, चंद्रशेखर हेमके, रामेश्वर काळे, सुरेश बोंबार्डे, विजय मरस्कोल्हे, भगवान गुट्टे, तेजराज नंदेश्वर, विरेंद्र खोटेले, अशोक बन्सोड, ए.बी. पारधी, आर. डोंगरे, तेजराम नेताम, ईश्वर माहुले, शिवकुमार राऊत, ए.टी. मारगाये, नंदकिशोर शहारे, मंगलमूर्ती सयाम, वाय.एल. मांढरे, नरेंद्र अमृतकर, भागवत भोयर, किशोर ब्राम्हण यांच्यासह समितीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.