शिक्षक व विद्यार्थ्यांचा केला सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2021 04:31 AM2021-09-21T04:31:32+5:302021-09-21T04:31:32+5:30

अध्यक्षस्थानी गटशिक्षणाधिकारी महेंद्र मोटघरे होते. बक्षीस वितरक म्हणून शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष पालीवाल, तर प्रमुख पाहुणे म्हणून गट ...

Teachers and students were felicitated | शिक्षक व विद्यार्थ्यांचा केला सत्कार

शिक्षक व विद्यार्थ्यांचा केला सत्कार

Next

अध्यक्षस्थानी गटशिक्षणाधिकारी महेंद्र मोटघरे होते. बक्षीस वितरक म्हणून शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष पालीवाल, तर प्रमुख पाहुणे म्हणून गट समन्वयक धनवंत कावळे, सदस्य मेश्राम, मुख्याध्यापक मंगल सयाम उपस्थित होते. यावेळी शैक्षणिक सत्र २०१८-१९मध्ये नवोदय विद्यालय प्रवेशप्राप्त दोन विद्यार्थी व शिष्यवृत्ती परीक्षेत प्राविण्यप्राप्त तीन विद्यार्थी तसेच शैक्षणिक सत्र २०१९-२०मधील नवोदय विद्यालय प्रवेशप्राप्त नऊ विद्यार्थी व शिष्यवृत्ती परीक्षेत प्राविण्यप्राप्त पाच विद्यार्थ्यांचा स्मृतिचिन्ह देऊन शाळेतर्फे सत्कार करण्यात आला. तसेच विद्यार्थ्यांच्या या यशामध्ये प्रमुख वाटा असणारे शिक्षक वाघदेवे यांचाही स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

विशेष म्हणजे, या शाळेतील शिक्षकांचे मनोधैर्य वाढविण्यासाठी व विद्यार्थ्यांना संगणकीय ज्ञान मिळावे, यासाठी नवोदय विद्यालय प्रवेशप्राप्त विद्यार्थ्यांच्या पालकांकडून गटशिक्षणाधिकारी मोटघरे यांच्यासह सर्व शिक्षकांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करीत शाळेला दोन संगणक संच भेट देण्यात आले. टेटे व मनोज गेडाम यांनी सूत्रसंचालन केले. वाघदेवे यांनी आभार मानले. कार्यक्रमासाठी चोपकर, लांजेवार, लिपिक टेकाम, आचले, झिंगरे, शिवणकर, नेताम, राऊत, सयाम, कापगते, मरस्कोल्हे, शहारे, बागडे, इतर कर्मचारी व पालकांनी सहकार्य केले.

Web Title: Teachers and students were felicitated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.