शिक्षक रंगले निवडणुकीच्या रंगात

By admin | Published: July 5, 2015 02:09 AM2015-07-05T02:09:14+5:302015-07-05T02:09:14+5:30

जिल्हा परिषद अंतर्गत प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेची निवडणूक रविवारी (दि.५) होत असून यात परिवर्तन पॅनल आणि सहकार पॅनल ...

The teachers are in the colors of elections | शिक्षक रंगले निवडणुकीच्या रंगात

शिक्षक रंगले निवडणुकीच्या रंगात

Next

शिक्षक पतसंस्थेची निवडणूक : अनेकांचे अध्यापनाकडे दुर्लक्ष, सायंकाळी ओली पार्टी
सालेकसा : जिल्हा परिषद अंतर्गत प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेची निवडणूक रविवारी (दि.५) होत असून यात परिवर्तन पॅनल आणि सहकार पॅनल यांच्यात चुरशीची लढत सुरू आहे. या निवडणुकीचा ज्वर मात्र शिक्षकांवर जास्त प्रमाणात दिसून येत आहे.
या निवडणुकीचे रंग आता मतदार शिक्षकांवर चांगलेच चढले आहे. प्राथमिक शिक्षकांमध्ये काही विद्यार्थी निष्ठ शिक्षक वगळता अनेक नेतागिरी करणारे शिक्षक अध्यापनाकडे दुर्लक्ष करुन रोज कोणत्या न कोणत्या उमेदवारांकडून आयोजित ओल्या पार्टीमध्ये सहभागी होताना दिसत आहेत.
काही शिक्षक आपल्या संघटनेशी निष्ठा दाखवित आपल्या उमेदवारांना निवडून देण्यासाठी संघर्ष करीत आहेत. तर अनेक शिक्षक असे आहेत की दोन्ही संघटनांच्या उमेदवारांच्या संपर्कात राहून दोन्ही कडून वाटेल ती सेवा करवून घेत आहेत. असे शिक्षक शेवटी कोणत्या उमेदवारावर मेहरबान होतील याबद्दल संभ्रम निर्माण होत आहे. त्यामुळे उमेदवाराची मोठी दमछाक होताना दिसत आहे.
मात्र खाऊ-पिऊ शिक्षकांचे दिवस मजेत जात आहेत. दुसरीकडे विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होत आहे. उद्याचे नागरिक घडविणारे शिक्षक जर आपले मत देण्यासाठी शिक्षकी पेशाला प्रतिकूल वर्तणूक करीत असतील तर शिष्यांना कोणत्या वाटेवर नेतील असा सवाल येथे उपस्थित केला जात आहे. (प्रतिनिधी)

Web Title: The teachers are in the colors of elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.