पालकांच्या दाराकडे वळली शिक्षकांची पावले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2021 04:30 AM2021-05-19T04:30:04+5:302021-05-19T04:30:04+5:30
बाराभाटी : गेल्या चौदा ते पंधरा महिन्यांपासून शाळा कोरोनाच्या संकटामुळे बंद आहेत. काही महिन्यांचा काळ हा ऑनलाईन क्लासमध्ये ...
बाराभाटी :
गेल्या चौदा ते पंधरा महिन्यांपासून शाळा कोरोनाच्या संकटामुळे बंद आहेत. काही महिन्यांचा काळ हा ऑनलाईन क्लासमध्ये गेला. पण, त्याचे फलीत मात्र शून्य आहे. अशातच सत्र संपून, दुसऱ्या सत्राच्या प्रवेश भरती प्रक्रियेला खासगी शाळेतील शिक्षकांची शोधमाेहीम सुरू झाली असून, पालकांच्या दाराकडे वळली शिक्षकांची पाऊले वळल्याचे चित्र आहे.
कोरोनामुळे अनेक विद्यार्थी हे शिक्षणापासून वंचित झाले. काहींच्या परीक्षा झाल्या नाही, तर काही आजही शाळा पाहायलाच आहेत, पण नाव मात्र शाळेत दाखल झाले. अशाप्रकारची कार्यप्रणाली खाजगी शाळेकडून सुरु झाली आहे. ग्रामीण भागात मुलांसाठी शोध मोहीम सुरु आहे, प्रवेश घेणे सुरु आहे, शाळा सोडल्याचा दाखला मिळविणे सुरु आहे. कोरोनामुळे विद्यार्थी झाले "ढ" एक वर्षांहून अधिक काळ शाळेचे दर्शनच झाले नाही. घरच्या घरी राहून बालकांची मानसिकता खराब झालेली आहे. रोजच कंटाळवाणे जीवन जगणे सुरू आहे. पुस्तकात डोकं रमत नाही आणि अभ्यासात मन लागत नाही म्हणून विद्यार्थी हा ढ झाल्याचे वास्तव आहे. पटसंख्येवरच शाळा उभ्या आहेत.
ऑनलाईन शिक्षण डोक्याच्या जाते. विद्यार्थी ऑनलाईन क्लासमुळे काही समजत नाही. ऑनलाईन क्लासेस फक्त आपण संवाद साधण्याचा प्रयत्न करतो. पण, काही लक्षात राहात नाही. आवाज समजत नाही, नेटवर्क समस्या ही तर जन्माची आहे, ऑनलाईन शिकविणे केवळ नावापुरतेच असल्याच्या प्रतिक्रिया विद्यार्थी देत आहेत.
.............
आई शाळा केव्हा सुरु होणार ग!
मागील वर्षी मार्च महिन्यात कोरोनाचा शिरकाव झाला. तेव्हापासून शाळा बंद आहेत. शाळेत न जाताच विद्यार्थी पुढच्या वर्गात गेले. यंदासुध्दा नवीन शैक्षणिक सत्र सुरु होणार किवा नाही, याबाबत शंका आहे. त्यामुळे विद्यार्थी घरी राहून कंटाळले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनासुध्दा आता शाळेची ओढ लागली असून, आई शाळा केव्हा सुरु होणार ग ! असे विचारात आहेत.