शिक्षकांनी काढला पंचायत समितीवर मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2019 06:00 AM2019-09-11T06:00:00+5:302019-09-11T06:00:12+5:30

राज्य शासकीय कर्मचारी व निमशसकीय कर्मचारी यांच्या समन्वय समितीच्या वतीने मंगळवारी दिवसभर संपूर्ण शाळा बंद ठेऊन संप पुकारण्यात आला. संपानिमीत्त सर्व शिक्षकांनी निदर्शने करण्यासाठी पंचायत समितीवर मोर्चा काढून पटांगणात निदर्शने करून शासनाच्या कर्मचारी धोरणाचा निषेध केला.

Teachers march on Panchayat Samiti | शिक्षकांनी काढला पंचायत समितीवर मोर्चा

शिक्षकांनी काढला पंचायत समितीवर मोर्चा

Next
ठळक मुद्देजुनी पेशंन योजना लागू करा : तहसीलदारांना दिले निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : राज्य शासकीय कर्मचारी व निमशसकीय कर्मचारी यांच्या समन्वय समितीच्या वतीने मंगळवारी दिवसभर संपूर्ण शाळा बंद ठेऊन संप पुकारण्यात आला. संपानिमीत्त सर्व शिक्षकांनी निदर्शने करण्यासाठी पंचायत समितीवर मोर्चा काढून पटांगणात निदर्शने करून शासनाच्या कर्मचारी धोरणाचा निषेध केला.
संपूर्ण शिक्षक शिक्षिकांनी पंचायत समिती ते शेंडारोडपर्यंत मोर्चा काढून जुनी पेन्शन लागू करण्याच्या घोषणा दिल्या. जुनी पेन्शन योजना चालू करणे, सातव्या वेतन आयोगामधील वेतन त्रृटया दूर करणे, केंद्राप्रमाणे वेतन भत्ते सुरू ठेवणे, केंद्र सरकारप्रमाणे महिला कर्मचाऱ्यांना प्रसूती व बालसंगोपण रजा मंजूर करने, खाजगीकरण व कंत्राटीकरण धोरण रद्द करणे, अनुकंपाभरती त्वरीत करण्यात यावी, शिक्षकांना अशैक्षणीक कामे न देणे आदी मागण्या मंजूर करण्याची मागणी केली. किशोर डोंगरवार,विजय डोये, जी.आर.गायकवाड, एस. पी.साखरे, वाय.एस.मुंगुलमारे, जिवन म्हशाखेत्री, हुमेन्द्र चंदेवार, स्नेहलता खुणे यांनी मोर्चात सहभागी शिक्षकांना मार्गदर्शन केले.यानंतर शिष्टमंडळातर्फे विविध मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्र्यांच्या नावे तहसीलदारांना देण्यात आले.शिष्टमंडळात बाळू वालोदे, पी.एन.बडोले, वाय.एस.मुंगुलमारे, जी.आर.गायकवाड,एम.पी. वाघाडे, एस.पी.साखरे, नरेश मेश्राम, रवी काशिवार, विनोद गहाने, भोजराज भोयर, राहुल कोणतंवार, महेश भिवगडे, तुषार मेश्राम, डी.एम.कोरे, ओ.बी.मस्के,लोकेश राऊत, माणिक बेंदवार, अमोल श्रीरंगे, के. एस.तरोणे, एम.वाय.तागडे, बी.एम. गुरनुले, ओ.बी.मेश्राम,भगवान बोकडे, भीमराव गहाने,नंदू वैद्य, हेमंत मडावी, मंगेश मेश्राम, मंगेश बोरकर, सुुरेश आमले, महेश शरणागत, संजीव बारसागडे, एकनाथ लंजे, मंगेश जांभळकर, राजू लोणारे, ए.जी.पाटील, डी.जे.दहीफडे यांच्यासह ५०० शिक्षक सहभागी झाले होते.

Web Title: Teachers march on Panchayat Samiti

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.