शिक्षकांचे शाळा बद आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2019 12:09 AM2019-08-10T00:09:16+5:302019-08-10T00:09:39+5:30

मागील १८ वर्षापासून उच्च माध्थमिक शिक्षक विना वेतन सेवा देत आहेत.परंतु शाळांना १०० टक्के विना वेतन सेवा देत आहेत. मात्र शाळांना १०० टक्के अनुदान नसल्यामुळे शिक्षकांचे बेहाल होत असून त्यांच्यासमोर कुुटुंब कसे चालवावे असा प्रश्न निर्माण झाला.

Teacher's School Bad Movement | शिक्षकांचे शाळा बद आंदोलन

शिक्षकांचे शाळा बद आंदोलन

Next
ठळक मुद्देअनुदानाची मागणी : शिक्षणमंत्र्यांना निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्क
सडक-अर्जुनी : मागील १८ वर्षापासून उच्च माध्थमिक शिक्षक विना वेतन सेवा देत आहेत.परंतु शाळांना १०० टक्के विना वेतन सेवा देत आहेत. मात्र शाळांना १०० टक्के अनुदान नसल्यामुळे शिक्षकांचे बेहाल होत असून त्यांच्यासमोर कुुटुंब कसे चालवावे असा प्रश्न निर्माण झाला. या मागण्यांचे निवेदन शिक्षणमंत्री आशिष शेलार यांच्या नावे तहसीलदारांना देण्यात आले.
महाराष्टÑ राज्य उच्च माध्यमिक शाळा कृती समिती जिल्हा गोंदिया अंतर्गत शिक्षण मंत्री यांना आपल्या मागण्यांचे निवेदन पाठविले. निवेदनातून मागील १८ वर्षापासून उच्च माध्यमिक शिक्षक विनावेतन सेवा देत आहेत. त्यामुळे त्यांची आर्थिक स्थिती फारच गंभीर झाली आहे. कौटुंबिक जवाबदाऱ्या पार पाडतांना अडचणी येतात त्यामुळे काही शिक्षक आत्महत्येचा मार्ग अवलंबत आहेत. त्यामुळे शासनाने विना अनुदानित उच्च माध्यमिक शाळा व तुकड्यांना १०० टक्के अनुदान दयावे, अन्यथा नाईलाजास्तव शाळा बंद आंदोलनात सहभागी व्हावे लागत आहे.याकरिता शासन जबाबदार असल्याचे म्हटले आहे. शाळा बंद आंदोलनामध्ये एच अ‍ॅन्ड टी कनिष्ठ कला महाविद्यालय सडक-अर्जुनी सावित्रीबाई मस्के कनिष्ठ महाविद्यालय खोडशिवनी, हिरालाल जैन कनिष्ठ महाविद्यालय खोबा,विक्रमबाबा कनिष्ठ महाविद्यालय डोंगरगाव, फुलीचंदजी भगत कनिष्ठ महाविद्यालय कोसमतोंडी, सचिन कनिष्ठ महाविद्यालय पाटेकुर्रा,बनारसीलाल अग्रवाल कनिष्ठ महाविद्यालय सडक-अर्जुनी यांचा समावेश आहे.

Web Title: Teacher's School Bad Movement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.