शिक्षकदिनी आंदोलनाचा शिक्षकांचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 05:02 AM2021-09-02T05:02:57+5:302021-09-02T05:02:57+5:30
गोंदिया : महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक विनाअनुदानित कृती कमवी संघटनेद्वारे नागपूर विभागीय सचिव प्राचार्य कैलास बोरकर यांनी २० टक्के ...
गोंदिया : महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक विनाअनुदानित कृती कमवी संघटनेद्वारे नागपूर विभागीय सचिव प्राचार्य कैलास बोरकर यांनी २० टक्के अनुदानित उच्च माध्यमिक शाळेतील शिक्षकांचे शालार्थ आयडीच्या नावावर मागील मे, जून, जुलै, ऑगस्ट या चार महिन्यांचे पगार थांबल्याने शिक्षकांची आर्थिक कोंडी झाली. ५ सप्टेंबरपूर्वी शिक्षकांचे पगार न झाल्यास शिक्षक दिनी आंदोलन करण्याचा इशारा संघटनेचे कैलास बोरकर यांनी दिला आहे.
संपूर्ण नागपूर विभागासह गोंदिया जिल्ह्यातील उच्च माध्यमिक मागील चार महिन्यांपासून वेतन थकल्याने शिक्षकांवर बिकट आर्थिक परिस्थिती ओढवली आहे. एकीकडे शासनाने २० वर्षांनंतर उच्च माध्यमिक शिक्षकांना १ नोव्हेंबर २०२० पासून २० टक्के अनुदानाची घोषणा करून एप्रिल २०२१ पर्यंत नियमित पगार दिले; परंतु मागील मे महिन्यापासून शिक्षकांचे पगार झाले नसल्याने उच्च माध्यमिक शिक्षकांवर उपासमारीची वेळ आली आहे. कोरोनाच्या काळात शिक्षकांचे जीव टांगणीला लागले आहेत. शासनाने ५ सप्टेंबरपूर्वी शिक्षकांच्या खात्यात पगार जमा न केल्यास गोंदिया जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र राज्य विनाअनुदानित कमवी कृती संघटनेद्वारे तीव्र आंदोलन करण्याचा इशारा कैलास बोरकर व संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी शासनाला दिला आहे.
...................
शालार्थ आयडीच्या नावावर पगार थांबविले
शासनाने २० वर्षांनंतर उच्च माध्यमिक शिक्षकांना १ नोव्हेंबर २०२० पासून २० टक्के अनुदानाची घोषणा करून एप्रिल २०२१ पर्यंत नियमित पगार सुरू केले. मा दोन महिने पगार नियमित दिल्यानंतर शालार्थ आयडी तयार झाली नसल्याचे सांगत मागील मे महिन्यापासून पगार थांबविला आहे. त्यामुळे शिक्षकांची आर्थिक कोंडी झाली आहे.