शाळा फुलविणाऱ्या शिक्षिका दीक्षा फुलझेले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2019 09:48 PM2019-05-11T21:48:32+5:302019-05-11T21:49:37+5:30
तेजस्वी राष्ट्र घडविण्यासाठी आदर्श शिक्षक हवेत. जिद्द, चिकाटी, सातत्य हे विद्यार्थ्यांच्या उत्थानासाठी खर्च केले तर कार्याचे चिज होते. विद्यार्थी घडलेत तर गुरूंचे नावलौकीक होतो. विद्यार्थ्यांना घडवितांना आपला आदर्श देखील उभा राहायला हवा, असे कार्य गुरूजींच्या हातून घडावे हे समाजाला अपेक्षित असते.
नरेश रहिले ।
लोकमत न्यूज नेटवर्क
तेजस्वी राष्ट्र घडविण्यासाठी आदर्श शिक्षक हवेत. जिद्द, चिकाटी, सातत्य हे विद्यार्थ्यांच्या उत्थानासाठी खर्च केले तर कार्याचे चिज होते. विद्यार्थी घडलेत तर गुरूंचे नावलौकीक होतो. विद्यार्थ्यांना घडवितांना आपला आदर्श देखील उभा राहायला हवा, असे कार्य गुरूजींच्या हातून घडावे हे समाजाला अपेक्षित असते. त्याच दिशेने शिक्षकी पेशात दीक्षा फुलझेले यांनी काम केले आहे.
आमगाव तालुक्याच्या कुंभारटोली येथे कार्यरत सहाय्यक शिक्षिका दीक्षा महादेव फुलझेले यांचा जन्म वैनगंगा नदीच्या काठावर वसलेल्या नागपूर जिल्ह्यातील कुही तालुक्यातील सोनेगाव येथे झाला.त्यांना लहानपणापासूनच शिक्षणाची आवड होती. त्यांचे वडील शेतकरी होते. पालक निरक्षर होते. इयत्ता १ ते ४ वर्ग सोनेगाव येथे शिक्षण घेतले. ५ वी ते १० वी पर्यंतचे जिवनापूर येथे दोन कि.मी.पायी जाऊन शिकल्या. १ ली ते ९ वीपर्यंत प्रथम क्रमांक घेऊन पास झाल्या.१० वी मध्ये शिकत असताना आजारामुळे गणित विषयात त्या नापास झाल्या.त्यांच्या वडीलांनी त्यांचे लग्न वयाच्या १७ व्या वर्षी कुही येथील फुलचंद राऊत यांच्याशी सन १९८५ करून दिले. ते भंडारा जिल्ह्यातील देवरी तालुक्यातील चिचगड येथे राहत होते. अल्पवयात झालेले त्यातच घरात फारसे कुणाचे शिक्षण नसतांना इतरांना शिक्षणासंदर्भात गोडीही नव्हती. परंतु दिक्षा यांनी शिक्षणाशी गोडी लावून लग्नानंतर १२ वी पास केले. सासरीच राहून विद्यार्थ्याना ज्ञानी कसे बनविता येईल यासाठी त्या झटल्या.रामाटोला हे खेडेगाव असल्याने तेथील विद्यार्थ्याचे पालक निरक्षर होते. तेथे साक्षरतेचे सायंकाळी खूप दिवस वर्ग लावले. सन २००२ मध्ये सर्वाना साक्षर केले. शिक्षण कार्याव्यतिरिक्त सन २००५ मध्ये गावाला हागणदारी गाव मुक्त करण्याचा निर्णय घेतला. त्यावेळीे शाळेला ‘साने गुरुजी स्वच्छ शाळा’ ही स्पर्धा जाहीर केली. शाळेत विविध उपक्रम राबविण्यात आले. झाडे लावले, बगीचा, वाचन कोपरा तयार केला. गांडूळ यात नॅडम खत खड्डा, विद्यार्थ्यांची १०० टक्के उपस्थिती व १०० प्रगती स्वेच्छेने सर्व संदेश यामध्ये सर्व उपक्रम तयार केले. त्यांनी जिव्ह्याळ्यातून शाळेला फुलविल्यामुळे तत्कालीन आयुक्त भालचंद भोसले यांच्या तपासणीत शाळेचा प्रथम क्रमांक मिळाला. विद्यार्थ्यांचे जीवन यशस्वी व्हावे यासाठी योगेश्वरी जियालाल राऊत हिला दत्तक घेतले. तिला अभ्यासाचे मार्गदर्शन व इतर सुविधा उपलब्ध करुन दिल्यानंतर अंजोरा येथे त्यांची बदली झाली. तेथे सुध्दा अप्रगत विद्यार्थ्याकरीता जास्तीचे वर्ग घेऊन १०० टक्के उपस्थिती व प्रगती हे ध्येय गाठले. तेथे १ ते ८ वर्ग असल्यामुळे खो-खो कबड्डी सारखे खेळाचे सामने घेतले. सांस्कृतिक कार्यक्रम, महिला मेळाव्यातून महिला सक्षमीकरणाचे काम केले. हे त्यांचे कार्य पाहता जिल्हा परिषदेने सन २०१५ साली सावित्रीबाई फुले पुरस्कार त्यांना प्रदान केला. त्यानंतरही त्यांनी स्वत:चे शिक्षण चालू ठेवून त्या पदवीधर झाल्या.
लग्नानंतर घेतले शिक्षण
सासरी गेल्यानंतर दिक्षा १० वी गणित ८५ टक्के गुण घेऊन पास झाल्या.नंतर डी.एड. उतीर्ण केले. सन १९९० ते १९९७ पर्यंत स्मिता प्राथमिक शाळा शिरपूर येथे दोन किलोमीटर पायी चालत जाऊन नोकरी केली. त्यांच्या घरची परिस्थिती हलाकीची होती.त्यानंतर १९९७ मध्ये दुय्यम निव्वळ सेवा मंडळ भंडारा येथे उतीर्ण केले. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा फुक्कीमेटा शाळेत नोकरी मिळाली तेथे त्यांनी साक्षरता वर्ग घेतले.