शिक्षकांची कोरोना टेस्ट होणार ; तालुक्याच्या ठिकाणीच नमुने घेतील (डमी)
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2021 04:29 AM2021-01-20T04:29:22+5:302021-01-20T04:29:22+5:30
गोंदिया : प्रजासत्ताक दिनाच्या दुसऱ्या दिवसापासून म्हणजेच २७ जानेवारीपासून वर्ग ५ ते ८ वीच्या शाळा सुरू होत असून शिक्षणमंत्र्यांनी ...
गोंदिया : प्रजासत्ताक दिनाच्या दुसऱ्या दिवसापासून म्हणजेच २७ जानेवारीपासून वर्ग ५ ते ८ वीच्या शाळा सुरू होत असून शिक्षणमंत्र्यांनी याची घोषणा केली आहे. त्यामुळे आता जिल्हा परिषद व खासगी शाळा सुरू करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. २७ जानेवारीपासून शाळा सुरू करण्याचे शासनाचे पत्र शिक्षण विभागाला प्राप्त झाले आहे. जिल्ह्यातील १६६४ शाळांत ९ हजार ९२९ शिक्षक कार्यरत असून शाळा सुरू होण्यापूर्वी त्या शिक्षकांची कोरोना चाचणी करण्याची तयारी शिक्षण विभागाची आहे. त्यासाठी तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मार्फत तालुकास्तरावर ही चाचणी करण्यात येणार आहे. शाळा सुरू करण्यासाठी शाळांचे निर्जंतुकीकरण कसे होणार यासाठी शिक्षण विभागाने शाळांना निर्जंतुकीकरण करण्यास सुरुवात केली आहे. शिक्षकांची कोरोना चाचणी झाल्यानंतरच त्यांना वर्गात घेतले जाणार आहे.
बॉक्स
तालुक्याच्या ठिकाणी होणार चाचणी
कोरोना चाचणी करण्यासाठी शिक्षकांना फक्त आपल्या तालुक्याच्या ठिकाणी जाऊन कोरोना चाचणी करावी लागणार आहे. तालुक्याच्या ठिकाणी नमुने गोळा करून तपासणीसाठी गोंदियाला आरोग्य विभाग पाठवेल. त्याचा अहवाल दोन दिवसाच्या आत आल्यावर अहवालाची प्रत घेऊन शिक्षकांना शाळेत जाता येईल. एखादा शिक्षक पॉझिटिव्ह आढळला तर त्याला नेहमीच्या प्रक्रियेतून जावे लागेल. शिवाय शाळेत जातांना मास्कचा वापर आवश्यक राहणार आहे. कोरोनासंदर्भात असलेले सर्व नियम पाळावेच लागणार आहेत.
जिल्ह्यातील शाळा संख्या
पाचवी-१,६६४
सहावी-१,६६४
सातवी-१,६६४
आठवी-१,६६४
जिल्ह्यातील विद्यार्थी संख्या-७९,३९५
जिल्ह्यातील शिक्षक संख्या- ९९२९
कोट
आजघडीला शिक्षकांची आरटी-पीसीआर तपासणी करणे तसेच शाळा निर्जंतुकीकरण करण्यासंदर्भात नियोजन जिल्हास्तरावरून करण्यात आले आहे. इयत्ता ५ वी ते ८ वीच्या शाळा सुरू करण्यासंदर्भात शासनाच्या प्राप्त दिशा निर्देशानुसार कार्य करण्यात येईल. तालुक्याच्या ठिकाणी शिक्षकांची कोरोना चाचणी होणार आहे.
- राजकुमार हिवारे, शिक्षणाधिकारी (प्राथमिक), गोंदिया