कोरोना काळात भींती करतात शिक्षकांची कामे ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2021 04:26 AM2021-08-01T04:26:45+5:302021-08-01T04:26:45+5:30
चरण चेटुले केशोरी : गेल्या वर्षीपासून कोरोना महामारीने शाळा बंद होत्या. यावर्षी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी पहिल्या टप्यात इयत्ता ...
चरण चेटुले
केशोरी : गेल्या वर्षीपासून कोरोना महामारीने शाळा बंद होत्या. यावर्षी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी पहिल्या टप्यात इयत्ता आठवी ते बारावीचे वर्ग असणाऱ्या शाळा सुरु करण्यात आल्या आहेत. पहिली ते सातवीपर्यंतचे वर्ग बंदच आहेत. त्यामुळे या वर्गांचे विद्यार्थी शिक्षणापासून दूर गेली आहेत. हे विद्यार्थी सुट्याचा फायदा घेत गावातील शाळेच्या पटांगणात जावून खेळण्यात दिसून येतात तर काही विद्यार्थी शाळेकडे पाहून शाळा सुरु होण्याची वाट पाहात शाळांच्या बोलक्या भिंतीकडे पाहून बाराखडी, गणिताचे विविध टेबल, भौगोलिक विषयाची माहिती एक ते शंभरपर्यंतचे पाढे, इंग्रजी बाराखडी इत्यादीचे ज्ञान शाळांच्या भिंतीवरुन पाठांतर करीत आहे.
जिल्हा परिषदच्या शिक्षण विभागाने माझे गाव, माझी शाळा या संकल्पनेतून प्रत्येक गावातील प्राथमिक शाळेच्या भिंती बोलक्या करुन शैक्षणिक उपक्रम राबविले. या उपक्रमातून शैक्षणिक जागृती विद्यार्थ्यांना व्हावी म्हणून शाळा सुंदर आणि बोलक्या झाल्या. कोरोना महामारीने शाळा बंद असल्यामुळे इयत्ता पहिली ते सातवीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना शाळेच्या पटांगणावर जावून खेळण्याची संधी उपलब्ध झाली आहे. त्याचाच फायदा घेत काही हुशार विद्यार्थी शाळेच्या भिंतीकडे पाहून जोडाक्षरे, बाराखडी, गणिताचे विविध टेबल, भौगोलिक विषयाची माहिती, एक ते शंभरपर्यंत पाढे, इंग्रजी बाराखडी, पार्ट ऑफ बॉडी आदी विषयाचे ज्ञान शाळांच्या भिंतीमधून विद्यार्थ्यांना मिळत आहे. इयत्ता पहिली ते सातवी या वर्गापर्यंतच्या शाळा अजूनही बंदच आहेत. त्यामुळे गावातील विद्यार्थी शाळेच्या पटांगणावर जावून खेळत असतात. काही हुशार विद्यार्थी शाळेच्या भिंतीवर असलेली माहिती दररोज वाचताना दिसून येत आहेत. यामध्ये इंग्रजीत फळांची नावे, स्वर व्यंजन, महिना, वार, विविध भौगोलिक माहिती, पाण्यांची माहिती, बाराखडी, गणिताचे टेबल विद्यार्थ्यांसाठी फारच उपयुक्त ठरत आहेत. जणू या भिंती शिक्षकांची कार्ये करीत असल्याचे दिसून येत आहे.