विद्यार्थी प्रगत करण्यासाठी तंत्रज्ञानाचे ज्ञान आवश्यक

By admin | Published: January 9, 2017 12:58 AM2017-01-09T00:58:49+5:302017-01-09T00:58:49+5:30

आजचा युग तंत्रज्ञानाचा युग आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना त्याचे ज्ञान असणे गरजेचे आहे.

Technology needs to be advanced to develop students | विद्यार्थी प्रगत करण्यासाठी तंत्रज्ञानाचे ज्ञान आवश्यक

विद्यार्थी प्रगत करण्यासाठी तंत्रज्ञानाचे ज्ञान आवश्यक

Next

एम.पी. हुकरे : डिजिटल वर्गखोली व वाचन कुटीचे उद्घाटन
शेंडा (कोयलारी) : आजचा युग तंत्रज्ञानाचा युग आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना त्याचे ज्ञान असणे गरजेचे आहे. राष्ट्रीय कार्यक्रम राबविताना शाळा व विद्यार्थी शंभर टक्के प्रगत करण्यासाठी याचा मोठा फायदा होईल. या शाळेतील शिक्षक डी.एल. देशकर यांना प्रोजेक्टर हाताळण्याचा बराच अनुभव असल्याने अडचणी येणार नाहीत, असे मार्गदर्शन केंद्रप्रमुख एम.पी. हुकरे यांनी केले.
सडक-अर्जुनी पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या शेंडा येथील जि.प. पूर्व माध्यमिक शाळेत डिजिटल वर्गखोली व वाचन कुटीचे उद्घाटन करण्यात आले. त्यावेळी ते मार्गदर्शन करीत होते.
ते पुढे म्हणाले, जि.प. शाळेत अनुभवी शिक्षक असल्याने विद्यार्थ्यांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. शाळेला डिजिटल केल्यामुळे गावकऱ्यांचे व देणगीदारांचे त्यांनी आभारही मानले. त्याचप्रमाणे शिक्षणाधिकारी उल्हास नरड यांच्या सांगितल्याप्रमाणे प्रत्येक कुटुंबाने स्वत:च्या घरी शौचालय तयार करण्याची विनंतीसुद्धा केली.
उपसभापती विलास शिवणकर यांच्या हस्ते, जि.प. सदस्य सरिता कापगते यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले. याप्रसंगी प्रामुख्याने पंचायत समिती सदस्य गीता टेंभरे, राजेश कठाणे, सरपंच कमल वैद्य, उपसरपंच छत्रपाल परतेकी, तंमुसचे अध्यक्ष निताराम मरस्कोल्हे, माजी सरपंच आनंद ईळपाते, ग्रामपंचायत सदस्य पंचफुला वाढीवे, भूमिता पंधरे, शारदा शेंडे, मुख्याध्यापक एम.आर. राऊत, पत्रकार वामन लांजेवार, मार्तंड परिहार, पंढरीनाथ लांजेवार, नूतन बोरकर, ऐमनदास लिल्हारे, कृपासागर जनबंधू, संजय बन्सोड, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष वर्षा तागडे, उपाध्यक्ष लिनता रामरामे, पवन टेकाम, जितेश मानवटकर, कैलाश शेंदरे, मंगल वैद्य, मुख्याध्यापक पी.बी. शहारे व केंद्रप्रमुख एम.पी. हुकरे उपस्थित होते.
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या छायाचित्राला माल्यार्पण करून कार्यक्रमाचा शुभारंभ झाला. स्वागत समारंभ आटोपल्यावर विद्यार्थिनींनी ‘रंगीला रंगीला मेरा देश है रंगीला’ या देशभक्तीपर गीतावर नृत्य करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.
याप्रसंगी अनेक वक्त्यांनी आपापले विचार मांडले. शिक्षिका व्ही.जे. उपरीकर यांच्या मार्गदर्शनात स्त्रियांसाठी हळदी-कुंकू, रांगोळी स्पर्धा, संगीत खुर्ची, गोंडी नृत्य व इतर पारंपरिक नृत्य सादर करण्यात आले. या वेळी विद्यार्थ्यांनी स्टॉल्स लावून कॅशलेस खरेदी-विक्रीचा संदेशही दिला.
प्रास्ताविक मुख्याध्यापक पी.बी. शहारे यांनी मांडले. संचालन डी.एल. देशकर यांनी केले. आभार व्ही.जे. उपरीकर यांनी मानले. कार्यक्रमासाठी शिक्षक ए.टी. वंजारी, आर.एन. झोडे, विजय सोनवाने, कांतिलाल मेश्राम, हरिचंद बावणे, ललिता बन्सोड, शाळा व्यवस्थापन समिती, शिक्षक पालक संघ, माता पालक संघाच्या रेखा बांते, अंजना वाढीवे व ग्रामस्थांनी सहकार्य केले. (वार्ताहर)

Web Title: Technology needs to be advanced to develop students

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.