दहा नवे आरोग्य उपकेंद्र लवकरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2018 01:08 AM2018-10-11T01:08:44+5:302018-10-11T01:09:26+5:30

तालुक्यातील नागरिकांना आरोग्याच्या चांगल्या सोयी सुविधा मिळाव्यात यासाठी गोंदिया तालुक्याचा केंद्र शासनाच्या हेल्थ वेलनेस योजनेत समावेश करण्यात आला आहे. तसेच ५६ प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात आयुर्वेदिक डॉक्टरांची नियुक्ती करण्यात येणार आहे.

Ten new health sub centers soon | दहा नवे आरोग्य उपकेंद्र लवकरच

दहा नवे आरोग्य उपकेंद्र लवकरच

googlenewsNext
ठळक मुद्देगोपालदास अग्रवाल : आसोली येथे आरोग्य शिबिर, ३९० रुग्णांची तपासणी

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : तालुक्यातील नागरिकांना आरोग्याच्या चांगल्या सोयी सुविधा मिळाव्यात यासाठी गोंदिया तालुक्याचा केंद्र शासनाच्या हेल्थ वेलनेस योजनेत समावेश करण्यात आला आहे. तसेच ५६ प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात आयुर्वेदिक डॉक्टरांची नियुक्ती करण्यात येणार आहे. नागरिकांना गावातच आरोग्याची चांगली सेवा मिळावी, यासाठी लवकरच दहा नवीन प्राथमिक आरोग्य उपकेंद्र सुरु करण्यात येणार असल्याची ग्वाही आ. गोपालदास अग्रवाल यांनी येथे दिली.
आसोली येथे नुकतेच नि:शुल्क आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. या वेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे वैद्यकीय अधिष्ठाता व्ही.पी.रुखमोडे, जि.प.आरोग्य सभापती रमेश अंबुले, डॉ.सतीश जयस्वाल, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.श्याम निमगडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.खंडाते, जि.प.महिला व बाल कल्याण सभापती लता दोनोडे, पं.स.सभापती माधुरी हरिणखेडे, उपसभापती चमन बिसेन, जि.प.सदस्य विजय लोणारे, हरिचंद कावळे, बंटी भेलावे, मिथून पटेल, दुलीचंद धुर्वे, जोशीराम भेलावे, सुरेंद्र मेश्राम, विजय कटरे, संतोष पटले, राहुल कापसे, अभिमन्यू पाटील, ओमप्रकाश पटले, विजय हरिणखेडे, कैलास सुरसाऊत, हिवरलाल शरणागत उपस्थित होते. आ. अग्रवाल म्हणाले, तालुक्यातील रुग्णांच्या सेवेसाठी शासनाने नुकतीच १०८ क्रमाकांची रुग्णवाहिकेची सेवा सुरू केली आहे. शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून या परिसराचा कायापालट केला जाईल. ग्रामीण भागातील नागरिकांना आरोग्याच्या दर्जेदार सेवा उपलब्ध करुन देण्यासाठी आपण सदैव कटिबध्द असल्याचे सांगितले. अंबुले यांनी आ.अग्रवाल यांच्या नेतृत्त्वात तालुक्यात अनेक विकास कामे सुरू आहेत. तसेच तालुक्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रात यंत्रसामुग्री उपलब्ध करुन देण्यासाठी ते प्रयत्नरत असल्याचे सांगितले. तसेच शासनाची आरोग्य सेवा आपल्या दारी पोहचविण्याचे कार्य खऱ्या अर्थाने त्यांच्या नेतृत्त्वात होत असल्याचे सांगितले. या वेळी उपस्थित अन्य मान्यवरांनी या वेळी मार्गदर्शन केले. आरोग्य शिबिरात ३९० रुग्णांची आरोग्य तपासणी करुन त्यांच्यावर औषधोपचार करण्यात आले. तर ११ रुग्णांची शस्त्रक्रियेसाठी निवड करण्यात आली. शिबिराच्या यशस्वीतेसाठी प्रदीपसिंह परिहार, रविंद्र ठाकूर, होलराज बिसेन, भुमेश्वर टेंभरे, किशोर मेहूरकर, महेंद्र बिंझाडे, महेंद्र गडपायले, विनोद बन्सोड, अशोक गायधने, प्रकाश तुरकर यांनी सहकार्य केले.

Web Title: Ten new health sub centers soon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.