अस्वलाच्या हल्ल्यातील जखमीला तेंदूपत्ता कंपनीकडून मदत ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2021 04:21 AM2021-05-31T04:21:32+5:302021-05-31T04:21:32+5:30
बाराभाटी : जंगलात तेंदूपत्ता संकलन करण्यासाठी गेलेल्या ग्राम बोळदे येथील शैलेश भय्यालाल रामटेके या तरूणावर तीन अस्वलांनी हल्ला ...
बाराभाटी : जंगलात तेंदूपत्ता संकलन करण्यासाठी गेलेल्या ग्राम बोळदे येथील शैलेश भय्यालाल रामटेके या तरूणावर तीन अस्वलांनी हल्ला करून २३ मे रोजी पहाटे जखमी केले होते. यावर तेंदूपत्ता कंपनीकडून शैलेशला आर्थिक मदत करण्यात आली आहे.
२३ मे रोजी पहाटे ०५.३० दरम्यान शैलेश रामटेके हा गावातीलच काही जणांसोबत तेंदूपत्ता संकलन करण्यासाठी जंगलात गेला होता. तेथे तीन अस्वलांनी त्याच्यावर हल्ला करून गंभीर जखमी केले होते. विशेष म्हणजे, पहाटे झालेल्या या हल्ल्यात विभागाने सायंकाळी पंचनामा करून विभागाचा कारभार किती संथ गतीने चालतो हे दाखवून दिले. त्यानुसार जखमी शैलेशला अद्याप वनविभागाकडून मदत देण्यात आलेली नाही. जखमी शैलेशवर उपचार सुरू असून त्याच्या खांद्याची जखम अजूनही पूर्णपणे बरी झालेली नाही. अशात तेंदूपत्ता कंपनी अपेक्स ट्रेडिंग कंपनी मालक प्रकाश काथरानी, व्यवस्थापक महेश रणदिवे, कोषागार चुन्नीलाल पटले, स्थानिक व्यवस्थापक कवडू धरणे, गज्जू बिसेन यांनी स्वहस्ते प्रतापगडच्या कार्यालयात जखमीचे भाऊ मनोज रामटेके, प्रभाकर दहीकर, ज्ञानू प्रधान, धम्मदीप मेश्राम व रमन रामटेके यांना उपचारासाठी आर्थिक मदत दिली.