टेन्शन ! जिल्ह्यात बाधितांचा आकडा चढताच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 04:53 AM2021-03-13T04:53:03+5:302021-03-13T04:53:03+5:30

राज्यात कोरोनाचा वाढता उद्रेक नक्कीच टेन्शन वाढविणारा आहे. विशेष म्हणजे, काही जिल्ह्यांत कोरोनाचा पुन्हा एकदा स्फोट झाला असून, तेथे ...

Tension! As the number of victims rises in the district | टेन्शन ! जिल्ह्यात बाधितांचा आकडा चढताच

टेन्शन ! जिल्ह्यात बाधितांचा आकडा चढताच

Next

राज्यात कोरोनाचा वाढता उद्रेक नक्कीच टेन्शन वाढविणारा आहे. विशेष म्हणजे, काही जिल्ह्यांत कोरोनाचा पुन्हा एकदा स्फोट झाला असून, तेथे लॉकडाऊन करावा लागत आहे. कोरोनाचा वाढता उद्रेक आता जिल्ह्यातही दिसून येत असून हळूवार का असोना मात्र बाधितांची संख्या झपाट्याने वाढत असल्याचे दिसत आहे. यामुळे मध्यंतरी कोरोना नियंत्रणात असताना बाधित कमी व मात करणारे जास्त ही स्थिती होती. मात्र आता बाधितांची संख्या मात करणाऱ्यांपेक्षा जास्त झाली आहे. गुरुवारी (दि. ११) जिल्ह्यात १६ बाधित आढळले असून, यामध्ये गोंदिया तालुक्यातील ५, तिरोडा १, आमगाव २, सालेकसा ४ तर सडक-अर्जुनी तालुक्यातील ४ रुग्ण आहेत, तर दहा रुग्णांनी कोरोनावर मात केली असून, यामध्ये गोंदिया तालुक्यातील ४, तिरोडा १, आमगाव १, सालेकसा १, तर अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील तीन रुग्ण आहेत.

यानंतर आता जिल्ह्यात १८४ क्रियाशील रुग्ण असून, यात गोंदिया तालुक्यातील १२१, तिरोडा १२, गोरेगाव ६, आमगाव २१, सालेकसा ५, देवरी ५, सडक-अर्जुनी ८, अर्जुनी-मोरगाव ४, तर इतर राज्य व जिल्ह्यातील दोन रुग्ण आहेत. यातील १३९ रुग्ण घरीच अलगीकरणात असून, यामध्ये गोंदिया तालुक्यातील ९७, तिरोडा ९, गोरेगाव ३, आमगाव १७, सालेकसा ३, देवरी ३, सडक-अर्जुनी ५, तर अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील दोन रुग्ण आहेत. या स्थितीनंतर जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.४६ टक्के असून, मृत्युदर १.२० टक्के, तर व्दिगुणीत गती ३८०.२ दिवस एवढी नोंदण्यात आली आहे.

-----------------------------

आतापर्यंत १८७ रुग्णांचा मृत्यू

जिल्ह्यात कोरोनाच्या कहरामुळे आतापर्यंत १८७ रुग्णांचा जीव गेला आहे. तालुकानिहाय बघितल्यास गोंदिया तालुक्यातील १०५, तिरोडा २४, गोरेगाव ६, आमगाव १३, सालेकसा ३, देवरी १०, सडक-अर्जुनी ५, अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील ११, तर इतर राज्य व जिल्ह्यातील १० रुग्ण आहेत.

-----------------------

१,५०,६९० कोरोना चाचण्या

कोरोनाचा वाढता उद्रेक बघता आता जिल्ह्यात कोरोना चाचण्यांची संख्या वाढविण्यावर भर दिला जात आहे. आतापर्यंत जिल्ह्यात १,५०,६९० कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये ७७,७५३ आरटी-पीसीआर चाचण्या असून, यात ८,६६६ पॉझिटिव्ह, तर ६५,१६३ निगेटिव्ह आहेत. तसेच ७२,९३७ रॅपिड ॲंटिजन चाचण्या असून, यातील ६,२४२ पॉझिटिव्ह, तर ६६,६९५ निगेटिव्ह आल्या आहेत.

Web Title: Tension! As the number of victims rises in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.