आजपासून दहावीची परीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2018 10:35 PM2018-02-28T22:35:40+5:302018-02-28T22:35:40+5:30
नागपूर विभागीय मंडळ नागपूरच्या वतीने घेण्यात येणाºया माध्यमिक शालांत परीक्षा इयत्ता दहावीची परीक्षा गुरुवारपासून (दि.१) सुरु होत आहे. यात जिल्ह्यातील विविध परीक्षा केंद्रावरुन २२ हजार ४८ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत.
ऑनलाईन लोकमत
गोंदिया : नागपूर विभागीय मंडळ नागपूरच्या वतीने घेण्यात येणाºया माध्यमिक शालांत परीक्षा इयत्ता दहावीची परीक्षा गुरुवारपासून (दि.१) सुरु होत आहे. यात जिल्ह्यातील विविध परीक्षा केंद्रावरुन २२ हजार ४८ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत.
गुरूवारपासून सुरू होणारी दहावीची परीक्षा सुरळीत व कॉपीमुक्त वातावरणात पार पडावी यासाठी सर्व आवश्यक उपाय योजना शिक्षण विभागातर्फे करण्यात आल्या आहे. विद्यार्थ्याना पेपर सोडवितांना कोणताही त्रास होणार नाही. परीक्षा केंद्रावर आवश्यक त्या भौतिक सोयीसुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
जिल्ह्यातील एकूण २२ हजार ६४८ विद्यार्थी दहावीची परीक्षा देणार आहेत. यात गोंदिया तालुक्यातील २६ केंद्रावरून ६६३२ विद्यार्थी, आमगाव तालुक्यातील १० केंद्रावरून २७६१ विद्यार्थी, अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील ९ केंद्रावरून २७६१ विद्यार्थी, देवरी तालुक्यातील १० केंद्रावरून २०४० विद्यार्थी, गोरेगाव तालुक्यातील ९ केंद्रावरून २१५९ विद्यार्थी, सडक-अर्जुनी तालुक्यातील ९ केंद्रावरून २७४७ विद्यार्थी, सालेकसा तालुक्यातील ६ केंद्रावरून १३५९ विद्यार्थी, तिरोडा तालुक्यातील १० केंद्रावरून २१८९ विद्यार्थी, एकूण ८९ केंद्रावरून २२ हजार ६४८ विद्यार्थी परीक्षा देणार ओहत.
जिल्ह्यात १४ भरारी पथक
दहावी परीक्षेसाठी जिल्ह्यात १४ भरारी पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे. यात माध्यमिक शिक्षणाधिकाºयांचे एक पथक, दुसरे पथक प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांचे, तिसरे पथक डायट प्राचार्यांचे, पाचवे पथक विशेष महिला भरारी पथक, सहावे पथक उपशिक्षणाधिकारी माध्यमिक व जिल्हाधिकाºयांच्या आदेशानुसार प्रत्येक तालुक्यात एक असे आठ भरारी पथक असे आठ पथक नेमण्यात आले आहेत. यंदा दोन केंद्र उपद्रवी म्हणून घोषीत करण्यात आले आहेत. त्यात बारावीसाठी जिल्हा परिषद कनिष्ठ महाविद्यालय परसवाडा तर दहावीसाठी जगत हायस्कूल घाटटेमनी यांचा समावेश आहे.
परीक्षा केंद्रावर मोबाईल बंदी आहे. विद्यार्थी किंवा पर्यवेक्षकांनी मोबाईल केंद्रावर आणू नये. पर्यवेक्षकांकडे मोबाईल आढळल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल.
-महेंद्र मोटघरे
शिक्षण विस्तार अधिकारी जि.प.गोंदिया.