रोजच्या वादावर भयंकर उपाय! सुनेचा कुऱ्हाडीने खून तर वहिणीचे कान छाटले

By नरेश रहिले | Published: September 24, 2023 05:52 PM2023-09-24T17:52:12+5:302023-09-24T17:52:29+5:30

गोंदिया तालुक्याच्या देवरी (धापेवाडा) येथील आरोपी प्रितमलाल सहेसराम ठाकरे (५५) हा शुल्लक कारणावरून भावाघरच्या मंडळींसोबत वाद करायचा.

Terrible solutions to everyday disputes Daughter-in-law was killed with an ax and sister-in-law's ears were cut off | रोजच्या वादावर भयंकर उपाय! सुनेचा कुऱ्हाडीने खून तर वहिणीचे कान छाटले

रोजच्या वादावर भयंकर उपाय! सुनेचा कुऱ्हाडीने खून तर वहिणीचे कान छाटले

googlenewsNext

गोंदिया : घराशेजारी घर असल्याने अधून-मधून खाक्या उडायच्या. क्षुल्लक-क्षुल्लक कारणातून होणाऱ्या वादावर कायमस्वरूपी विराम आणायचा म्हणून पुतन सुनेवर कुर्हाडीने घाव घालून खून केला. तर वहिणीचे कुऱ्हाडीने कान छाटल्याची घटना २४ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजता गोंदिया तालुक्याच्या देवरी धापेवाडा येथे घडली. सुनिता दिनेश ठाकरे (३५) रा. देवरी असे मृत महिलेचे नाव आहे. तर रिमनबाई प्रेमलाल ठाकरे (६०) रा. देवरी असे गंभीर जखमी असलेल्या वहीणीचे नाव आहे.

गोंदिया तालुक्याच्या देवरी (धापेवाडा) येथील आरोपी प्रितमलाल सहेसराम ठाकरे (५५) हा शुल्लक कारणावरून भावाघरच्या मंडळींसोबत वाद करायचा. या वादात तो ठार मारीन अन् जेल भोगून येईल असे नेहमी म्हणायचा. २४ सप्टेंबर रोजी मृतक सुनिता ठाकरे व तिची सासू रिमनबाई ठाकरे ह्या दोघ्याही घरीच होत्या. तिचे पती झिटाबोडी येथे गेले होते. तर सासरे हे शेतात गवत आणायला गेले होते. घरी असलेल्या सासू- सुनेसोबत आरोपी प्रितमलाल ठाकरे (५५) याने वाद सुरू केला. तणस आणि गवतावरून उत्पन्न झालेला वाद खुनावर येऊन थांबला. गवतावरून झालेल्या वादात आरोपी प्रितमलाल याने कुऱ्हाड आणून सुनिताच्या गळ्यावर, डोक्यावर सपासप वार केला. यात रक्ताच्या थारोड्यात पडलेल्या सुनिताचा क्षणार्धात मृत्यू झाला. तो इतक्यातच थांबला नाही. त्याने आपल्या हातातील कुऱ्हाड रिमनबाई यांच्यावर उगारली. यात त्यांचा एक कान छाटल्या गेला. त्यांना गंभीर जखमी अवस्थेत उपचारासाठी गोंदियाच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरू आहे. मृत पावलेल्या सुनिता ठाकरे यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी गोंदियाच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आणण्यात आले. उत्तरीय तपासणी करून मृतदेह नातेवाईकांना सोपविण्यात आला.

तेरवीला जाण्याचे नियोजन असतांना घरातच झाला खून
गोंदिया तालुक्याच्या गिरोला येथे एका नातेवाईकांच्या घरी तेरवीचा कार्यक्रम होता. त्या कार्यक्रमाला जाण्याची तयारी प्रेमलाल ठाकरे व रिमन ठाकरे यांची होती. जनावरांसाठी गवत आणतो त्यानंतर तेरवीला जाऊ असे प्रेमलाल यांनी पत्नी रिमन यांना सांगून ते शेतात गवत आणायला गेले होते. परंतु शेतातून घरी परतताच प्रेमलाल यांना सुनेचा मृतदेह रक्ताच्या थारोड्यात पडलेला दिसला. तर त्यांची पत्नी गंभीर जखमी अवस्थेत तडफडत होती.

अन् सायकलने आरोपी पळत सुटला
सुनिताला कुऱ्हाडीने मारून तिचा खून करणारा आरोपी प्रितमलाल ठाकरे हा या घटनेनंतर आपली सायकल घेऊन जोराजोराने वाहन चालवितांना जात असतांना झिटाबोडी वरून परत येणारे मृतकचे पती दिनेश ठाकरे यांना तो दिसला. परंतु त्यांना या घटनेची किंचीतही कल्पना नसल्याने त्यांनी त्याच्याकडे दुर्लक्ष करीत आपले घर गाठले. घरी आल्यावर त्यांना या घटनेची माहिती झाली.

सहा महिन्यापूर्वी दिली होती ठार करण्याची धमकी
पाच-सहा महिन्यापूर्वी आरोपी व मृतक यांचा वाद झाला होता. या वादात आरोपीने ठार केल्याशिवाये राहणार नाही. तुम्हाला ठार करीन अन् जेल भोगून येईन असे तो म्हणायचा. त्याने घरी पुरूष मंडळी नसल्याची संधी साधत त्यांचा खून केला.

Web Title: Terrible solutions to everyday disputes Daughter-in-law was killed with an ax and sister-in-law's ears were cut off

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.