२७८६ नमुन्यांची चाचणीत सहा नमुने पाॅझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2021 04:20 AM2021-06-28T04:20:47+5:302021-06-28T04:20:47+5:30

कोरोनाचा संसर्ग आटोक्यात असला तरी धोका पूर्णपणे टळलेला नाही. त्यातच आता कोरोनाच्या डेल्टा प्लसच्या रुग्णसंख्ये काही जिल्ह्यांमध्ये वाढ होत ...

In the test of 2786 samples, six samples were positive | २७८६ नमुन्यांची चाचणीत सहा नमुने पाॅझिटिव्ह

२७८६ नमुन्यांची चाचणीत सहा नमुने पाॅझिटिव्ह

Next

कोरोनाचा संसर्ग आटोक्यात असला तरी धोका पूर्णपणे टळलेला नाही. त्यातच आता कोरोनाच्या डेल्टा प्लसच्या रुग्णसंख्ये काही जिल्ह्यांमध्ये वाढ होत आहे. त्याच पार्श्वभूमीवर सोमवारपासून राज्यात काही प्रमाणात निर्बंध लागू करण्यात केले जाणार आहे. जिल्ह्यात डेल्टा प्लसचा एकही रुग्ण सापडला नाही. तरीदेखील आरोग्य विभागाकडून काही नमुने तपासणीसाठी पुणे आणि दिल्ली येथील प्रयोगशाळेत पाठविले आहे जात आहे. कोरोनाचा संसर्ग आटोक्यात ठेवण्यासाठी जिल्हावासीयांनी कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याची गरज आहे. कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने जिल्ह्यात आतापर्यंत १,९१,९९१ स्वॅब नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी १,६६,९४९ नमुने निगेटिव्ह आले. कोरोनाबाधितांचा त्वरित शोध घेण्यासाठी रॅपिड अँटिजन टेस्ट केली जात आहे. याअंतर्गत २,१५,५३९ नमुने तपासणी करण्यात आले. त्यापैकी १,९४,५८९ नमुने निगेटिव्ह आले आहे. जिल्ह्यात सद्यस्थितीत ४८ कोरोना ॲक्टिव्ह रुग्ण असून, ४७१ स्वॅब नमुन्यांचा अहवाल प्राप्त व्हायचा आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ४१,११६ कोरोना बाधित आढळले असून, त्यापैकी ४०,३३६ जणांनी कोरोनावर मात केली आहे.

.............

कोरोनाचा रिकव्हरी रेट ९८.१८ टक्के

जिल्ह्यात मागील महिनाभरापासून कोरोनाचा संसर्ग पूर्णपणे आटोक्यात आहे. त्यातच बाधितांपेक्षा मात करणाऱ्या रुग्णांचे प्रमाण अधिक असल्याने कोरोनाचा रिकव्हरी रेट ९८.१८ टक्के असून, तो राज्याच्या रिकव्हरी रेटपेक्षा अधिक आहे. ही जिल्हावासीयांसाठी दिलासादायक बाब आहे.

...............

Web Title: In the test of 2786 samples, six samples were positive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.