२९१० नमुन्यांची चाचणी ८ आले पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2021 04:20 AM2021-06-24T04:20:36+5:302021-06-24T04:20:36+5:30
गोंदिया : कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने बुधवारी (दि.२३) एकूण २९१० नमुन्यांची चाचणी करण्यात आली. यात ८१० नमुन्यांची आरटीपीसीआर तर २१८५ ...
गोंदिया : कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने बुधवारी (दि.२३) एकूण २९१० नमुन्यांची चाचणी करण्यात आली. यात ८१० नमुन्यांची आरटीपीसीआर तर २१८५ नमुन्यांची रॅपिड अँटिजन टेस्ट करण्यात आली. यात ८ नमुने कोरोना पॉझिटिव्ह आले. त्याचा पॉझिटिव्हिटी रेट ०.२७ टक्के आहे.
जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आला असून ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या ४६ वर आली आहे. ही जिल्हावासीयांसाठी निश्चितच आनंदाची बाब आहे. बुधवारी जिल्ह्यात १८ बाधितांनी कोरोनावर मात केली तर ८ नवीन रुग्णांची नोंद झाली. तिसऱ्या सलग पाचव्या दिवशी एकाही कोरोनाबाधित मृतकाची नोंद झाली नाही. कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने आतापर्यंत जिल्ह्यात १८८९६३ स्वॅब नमुन्यांची चाचणी करण्यात आली. त्यापैकी १६३८६४ नमुने निगेटिव्ह आले आहे. कोरोना बाधितांचा त्वरित शोध घेण्यासाठी रॅपिड अँटिजन टेस्ट केली जात आहे. यातंर्गत २०७२१३ नमुने तपासणी करण्यात आले. त्यापैकी १८६२७६ नमुने निगेटिव्ह आले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ४१०९७ कोरोना बाधित आढळले असून यापैकी ४०३५२ जणांनी कोरोनावर मात केली आहे. सद्य:स्थितीत ४६ कोरोना ॲक्टिव्ह रुग्ण असून ५६ स्वॅब नमुन्यांचा अहवाल गोंदिया येथील प्रयोगशाळेकडून प्राप्त व्हायचा आहे. कोरोनाचा रिकव्हरी रेट ९८.१९ टक्के आहे.
............