सालेकसा तालुक्यात मलेरियाचे थैमान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2021 05:00 AM2021-08-07T05:00:00+5:302021-08-07T05:00:07+5:30

जुलै महिन्याच्या  दुसऱ्या आठवड्यापासून दररोज मलेरियाच्या एक दोन रुग्णांची नोंद होत होती. आतापर्यंत संसर्ग झालेल्या एकूण १२७ रुग्णांपैकी तब्बल ११० रुग्ण प्राथमिक आरोग्य केंद्र दरेकसा अंतर्गत समावेश असलेल्या छत्तीसगड, मध्यप्रदेशच्या सीमेलगत गावांमधील आहेत. या गावामध्ये दरवर्षी पावसाळ्याला सुरुवात झाल्यानंतर मलेरिया रुग्ण संख्या सुद्धा झपाट्याने वाढते. 

Thaiman of malaria in Saleksa taluka | सालेकसा तालुक्यात मलेरियाचे थैमान

सालेकसा तालुक्यात मलेरियाचे थैमान

Next

विजय मानकर
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : दरवर्षी सर्वाधिक मलेरिया रुग्णांची नोंद सालेकसा तालुक्यात होते. यंदाही तालुक्यात मलेरियाने थैमान घातले आहे. पंधरा दिवसाच्या कालावधीत १२७ हिवतापाच्या रुग्णांची नोंद झाली आहे. १२७ पैकी ७३ रुग्ण गंभीर स्वरुपाच्या (पी.एफ.) मलेरिया संसर्गाचे निघाले असून त्यापैकी आतापर्यंत २० रुग्णांना ग्रामीण रुग्णालय सालेकसा किंवा जिल्हा सामान्य रुग्णालय गोंदियाला रेफर करण्यात आले. मलेरियाच्या रुग्ण संख्येत वाढ होत असल्याने या परिसरात आरोग्य शिबिर लावण्याची गरज आहे. 
जुलै महिन्याच्या  दुसऱ्या आठवड्यापासून दररोज मलेरियाच्या एक दोन रुग्णांची नोंद होत होती. आतापर्यंत संसर्ग झालेल्या एकूण १२७ रुग्णांपैकी तब्बल ११० रुग्ण प्राथमिक आरोग्य केंद्र दरेकसा अंतर्गत समावेश असलेल्या छत्तीसगड, मध्यप्रदेशच्या सीमेलगत गावांमधील आहेत. या गावामध्ये दरवर्षी पावसाळ्याला सुरुवात झाल्यानंतर मलेरिया रुग्ण संख्या सुद्धा झपाट्याने वाढते. 
सालेकसा तालुक्यात एकूण चार प्राथमिक आरोग्य केंद्र असून केंद्र निहाय मलेरिया संसर्ग बघितला तर प्राथमिक आरोग्य केंद्र कावराबांध येथे आतापर्यंत एकही रुग्ण मिळाला नाही. परंतु प्राथमिक आरोग्य केंद्र सातगाव अंतर्गत ०३, प्राथमिक आरोग्य केंद्र बिजेपार अंतर्गत १४ आणि प्राथमिक आरोग्य केंद्र दरेकसा अंतर्गत एकूण ११० मलेरिया रुग्णांची नोंद झाली आहे. 
१२७ पैकी ५४ रुग्ण सामान्य स्वरुपाच्या मलेरियाचे ज्याला पीव्ही (प्लामोडियम विवैक्स) म्हणतात. ७३ रुग्ण पीएफ (प्लाजमोडियम फाल्सीपेरम) गंभीर स्वरुपाच्या मलेरियाचे आढळले. गंभीर स्वरुपाचा मलेरिया संसर्ग झाल्यास याचा प्रभाव मेंदूपर्यंत वाढतो आणि सोबतच रक्तातील प्लाज्मा स्तर फारच खाली येतो. 
अशात रुग्णांना रक्ताची सुद्धा गरज पडत असते. परंतु सुदैवाने आतापर्यंत एकूण ७३ पैकी कोणत्याही रुग्णांना अशी वेळ आली नाही.
 

रोगप्रतिकारक क्षमता चांगली
- इतर भागांमध्ये पीएफ (प्लाजमोडियम फाल्सीपेरम) मलेरियाचा संसर्ग झाल्यास रुग्ण  दगावण्याची शक्यता असते. ८० टक्के संसर्गात रुग्ण दगावतात परंतु पिपरीया, दरेकसा परिसरातील लोकांना पी.एफ. स्वरुपाचा मलेरियाचा संसर्ग पी.व्ही. स्वरुपाच्या मलेरियापेक्षा जास्त  असूनही रुग्णांना औषधोपचार दिल्यास ते बरे होत आहेत. या मागील कारण म्हणजे या भागातील लोकांची रोग प्रतिकारक शक्ती चांगली आहे. 

 या गावांमध्ये वाढला संसर्ग
-  तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र दरेकसा अंतर्गत पिपरिया, दरेकसा आणि जमाकुडो उपकेंद्रातील गावांमध्ये सर्वात जास्त संसर्ग वाढला असून पिपरिया, टेंभूटोला, बाकलसर्रा, लाकडाटोला, दरेकसा अंतर्गत मुरकुटडोह, दंडारी, टेकाटोला, दलदलकुही, बोईरटोला, नवाटोला, धनेगाव, जमाकुडो अंतर्गत टोयागोंदी, चांदसूरज, बिजेपार या घनदाट जंगलाला लागून असलेल्या गावामध्ये मलेरियाचा संसर्ग सर्वाधिक वाढला आहे. ही गावे मध्यप्रदेश, छत्तीसगड सीमेवर असून सीमेपलीकडे त्या प्रांतातील गावामधून मलेरिया संसर्ग महाराष्ट्रात वाढत आहे. 

यंदाही मलेरियाचे रुग्ण अपेक्षितपणे वाढले असून तालुक्याची व जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा तत्परतेने कार्य करीत आहे. मलेरियावर नियंत्रण ठेवण्यास यश आले आहे. रुग्णांची ओळख करण्यासाठी आरोग्य सेवक प्रत्येक घरी भेट देऊन रक्ताचे नमुने तपासणीसाठी स्वाईप गोळा करीत आहे. 
-डॉ. अमित खोडणकर, 
तालुका आरोग्य अधिकारी, सालेकसा

 

Web Title: Thaiman of malaria in Saleksa taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Healthआरोग्य