ठाकूर यांनी दिला राष्टÑधर्माचा संदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2018 09:49 PM2018-04-21T21:49:23+5:302018-04-21T21:49:23+5:30

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग तथा अखिल भारतीय श्री गुरूदेव सेवामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक सप्ताहांतर्गत त्यांच्या विचारांवर संगीतमय प्रबोधन कार्यक्रम घेण्यात आला.

Thakur gave message to the people of religion | ठाकूर यांनी दिला राष्टÑधर्माचा संदेश

ठाकूर यांनी दिला राष्टÑधर्माचा संदेश

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग तथा अखिल भारतीय श्री गुरूदेव सेवामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक सप्ताहांतर्गत त्यांच्या विचारांवर संगीतमय प्रबोधन कार्यक्रम घेण्यात आला. यात हभप ठाकूर यांनी बाबासाहेबांच्या विचारांतून राष्ट्रधर्माचा संदेश मिळत असल्याचे सांगितले. याप्रसंगी प्रामुख्याने समाजकल्याण उपायुक्त मंगेश वानखेडे, जि.प. समाजकल्याण अधिकारी मिलिंद रामटेके, वाघ, खेडीकर, सोनटक्के, झोडे, जटाळे, विद्या मोहाळे, डॉ. भोजलाल बिसेन, लिखन निर्विकार उपस्थित होते.
या वेळी ठाकूर महाराजांनी समता, न्याय, बंधूता व राष्ट्रीय एकात्मतेची भावना वृद्धिंगत केल्याने जगात शांती व अहिंसा परमो धर्म स्थापित होवू शकेल. असे सांगून त्यांनी बाबासाहेबांचा जन्म, शिक्षण, उच्च शिक्षण, संविधानाचा मसुदा, गणतंत्र दिवस आदी विषयांवर संगीतमय प्रबोधन केले. तसेच त्यांच्या सहकाऱ्यांनी बाबासाहेबांच्या जीवनावर प्रकाश टाकला.
हभप शामराव ठाकूर, हभप रघुनाथ येळे, हभप रामचंद्र नेवारे, केशोराव नागोसे यांनी गीत, पोवडे सादर केले. बांसरीवादक विरेंद्रसिंह राठोड, ढोलक मास्टर रामू नेवारे, गायक श्रीराम तेलंग, हारमोनियम वादक अशोक हरिणखेडे, तुनतुना वादक देवचंद ठाकरे आदी कलावंतांनी उत्कृष्ट संगत दिली. या वेळी मंगेश वानखेडे यांनी पुस्तक भेट देवून सर्व कलावंताचा सत्कार केला. आभार मिलिंद रामटेके यांनी मानले.

Web Title: Thakur gave message to the people of religion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.