ठाणेगाव-गराडा रस्ता उखडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2018 09:54 PM2018-07-23T21:54:42+5:302018-07-23T21:55:00+5:30
जिल्हा परिषद सार्वजनिक बांधकाम विभाग अंतर्गत येणाऱ्या ठाणेगााव-गराडा रस्त्यावर ठिकाणी मोठमोठे खड्डे पडून रस्ता उखडला आहे.परिणामी या मार्गावरील अपघातांच्या संख्येत वाढ झाली आहे. वांरवार रस्ता दुरूस्तीची मागणी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांकडून सुध्दा सुध्दा त्यांनी याची दखल घेतली नाही. त्यामुळे गावकऱ्यांची समस्या कायम आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
सुकडी (डाकराम) : जिल्हा परिषद सार्वजनिक बांधकाम विभाग अंतर्गत येणाऱ्या ठाणेगााव-गराडा रस्त्यावर ठिकाणी मोठमोठे खड्डे पडून रस्ता उखडला आहे.परिणामी या मार्गावरील अपघातांच्या संख्येत वाढ झाली आहे. वांरवार रस्ता दुरूस्तीची मागणी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांकडून सुध्दा सुध्दा त्यांनी याची दखल घेतली नाही. त्यामुळे गावकऱ्यांची समस्या कायम आहे.
चुरडी ते गराडा या रस्त्याचे मागील दोन वर्षापूर्वी डांबरीकरण करण्यात आले. मात्र अल्पावधीत रस्ता उखडल्याने रस्ता बांधकामावर प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे.
या रस्त्याची दुरूस्ती करण्यात यावी अशी मागणी स्थानिक लोकप्रतिनिधींकडे गावकऱ्यांनी अनेकदा केली. मात्र त्यांचे याकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप परिसरातील गावकºयांनी केला आहे. प्राप्त माहितीनुसार जिल्हा परिषद सार्वजनिक बांधकाम विभाग तिरोडा अंतर्गत दोन वर्षापूर्वी चुरडी -काशीघाट नाल्यापासून ते गराडापर्यंत रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले. रस्ता डांबरीकरणाचे काम सुरु असताना अनेकांनी बांधकामात वापरल्या जाणाऱ्या साहित्यावर सवाल उपस्थित केला होता. मात्र याकडे संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले.
ठाणेगाव ते गराडा या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहनाची वर्दळ असते. तर तिरोडा येथे अदानी विद्युत प्रकल्प असल्याने व तिरोड्याला जाणारा हाच मुख्य मार्ग आहे. या परिसरातील विद्यार्थी शिक्षणासाठी तर गावकरी विविध कामासाठी तिरोडा तालुक्याच्या ठिकाणी जातात. मात्र रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले असल्याने त्यांना गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे.
रस्त्यावर पडलेल्या खड्डयामुळे या मार्गावर अनेक अपघात सुध्दा झाले आहे. पण, यानंतरही प्रशासन व लोकप्रतिनिधीनी याची दखल घेतलेली नाही.
त्यामुळे दोन वर्षांपूर्वी तयार करण्यात आलेल्या या रस्ता बांधकामाची चौकशी करुन संबंधित कंत्राटदारावर कारवाई करण्याची मागणी गावकºयांनी केली आहे.