चबुतऱ्यावर ‘कचरा का टाकला?’ असे विचारणाऱ्याचा केला खून

By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2023 03:42 PM2023-01-27T15:42:58+5:302023-01-27T15:43:26+5:30

सिंधीटोला (कामठा) येथील घटना : बेदम मारहाणीमुळे झाला मृत्यू

The person who asked 'Why did you throw garbage on the pavement?' was killed | चबुतऱ्यावर ‘कचरा का टाकला?’ असे विचारणाऱ्याचा केला खून

चबुतऱ्यावर ‘कचरा का टाकला?’ असे विचारणाऱ्याचा केला खून

googlenewsNext

गोंदिया : बिरसा मुंडाची प्रतिमा स्थापन करण्यासाठी उभारण्यात आलेल्या चबुतऱ्यावर आरोपीने बकऱ्यांचा चारा टाकला. हा चारा कशाला टाकला? असे विचारणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण करून आरोपीने त्याचा खून केला. ही घटना २३ जानेवारी रोजी घडली. बळीराम अनंतराम उईके (५५, रा. सिंधीटोला - कामठा) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर कुवरलाल आत्माराम तावाडे (५८) असे आरोपीचे नाव आहे.

गोंदिया तालुक्यातील सिंधीटोला (कामठा) येथे आरोपीच्या घरासमोरील सिमेंट रोडवर शिवमंदिर शेजारी बिरसा मुंडा यांची प्रतिमा स्थापन करण्यासाठी बळीराम अनंतराम उईके यांनी चबुतरा तयार केला होता. त्या चबुतऱ्यावर आरोपी कुवरलाल आत्माराम तावाडे याने २२ जानेवारी रोजी सायंकाळी आपल्या बकऱ्यांना चारा देण्यासाठी चबुतऱ्यावर बकरीचा चारा टाकला. यातून दोघांत बाचाबाची झाली. २२ जानेवारीच्या रात्री ८ वाजता आरोपीने बळीरामला लाथाबुक्क्यांनी डोक्यावर, मानेवर मारून गंभीर जखमी केले. यात त्यांचा २३ जानेवारी रोजी दुपारी १२:३० वाजता मृत्यू झाला.

यासंदर्भात शेवंती बलिराम उईके (५०) यांच्या तक्रारीवरून रावणवाडी पोलिसांनी भादंविच्या कलम ३०२, ३२३, ५०४ सहकलम ३ (२), (व्ही) अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. तपास उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील ताजने करीत आहेत.

Web Title: The person who asked 'Why did you throw garbage on the pavement?' was killed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.