गोंदिया-तिरोडा विधानसभा क्षेत्राच्या आमदारांची प्रतिष्ठा लागली पणाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2022 09:28 PM2022-11-13T21:28:28+5:302022-11-13T21:34:17+5:30

राजकारणातील प्रवेशाची पहिली पायरी समजल्या जाणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीला अलीकडे विशेष महत्त्व आले आहे. १५ व्या आयोगामुळे ग्रामपंचायतीला मिळणाऱ्या निधीत वाढ झाली असून, अधिकारही वाढले आहेत. त्यामुळेच अनेकजण आता जि. प. सदस्य होण्यापेक्षा गावचा सरपंच होण्यात भले मानत गावाच्या राजकारणात रस घेत आहेत.

The reputation of MLAs of Gondia-Tiroda Assembly Constituency is at stake | गोंदिया-तिरोडा विधानसभा क्षेत्राच्या आमदारांची प्रतिष्ठा लागली पणाला

गोंदिया-तिरोडा विधानसभा क्षेत्राच्या आमदारांची प्रतिष्ठा लागली पणाला

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : ऑक्टोबर ते डिसेंबर २०२२ या कालावधीत मुदत संपणाऱ्या जिल्ह्यातील ३४८ ग्रामपंचायतींचा सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम नुकताच जाहीर करण्यात आला आहे. निवडणूक कार्यक्रम जाहीर होताच जिल्ह्यातील ३४८ गावांमध्ये गुलाबी थंडीत  हळूहळू राजकीय वातावरण तापण्यास सुरूवात झाली आहे. 
राजकारणातील प्रवेशाची पहिली पायरी समजल्या जाणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीला अलीकडे विशेष महत्त्व आले आहे. १५ व्या आयोगामुळे ग्रामपंचायतीला मिळणाऱ्या निधीत वाढ झाली असून, अधिकारही वाढले आहेत. त्यामुळेच अनेकजण आता जि. प. सदस्य होण्यापेक्षा गावचा सरपंच होण्यात भले मानत गावाच्या राजकारणात रस घेत आहेत. त्यातच या निवडणुकीत  सरपंचाची निवड ही थेट जनतेतून केली जाणार असल्याने या निवडणुकीतील चुरस अधिक वाढली आहे. 
तर या निवडणुकीनंतर नगर परिषद, नगर पंचायत आणि पुढे लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका आहेत. स्थानिक राजकारणावर पकड मजबूत करण्यासाठी पुढील निवडणुकांची पायवाट मोकळी करण्यासाठी ग्रामपंचायत निवडणुकांना विशेष महत्त्व आहे. त्यामुळेच विविध राजकीय पक्षांच्या पुढाऱ्यांकडून प्रभावी अशा महिला व पुरुष उमेदवारांचा शोध घेण्यास सुरूवात झाली आहे. तर काहीजण अपक्ष निवडणूक लढू, असे म्हणत थेट जनसंपर्क वाढविण्याच्या कामाला लागले आहेत. एकूणच ऐन थंडीच्या दिवसांत जिल्ह्यातील ३४८ गावांतील राजकीय वातावरण तापण्यास सुरूवात झाली आहे. 
 

तालुकानिहाय ग्रामपंचायतींची संख्या
 

२३ डिसेंबरपर्यंत जिल्ह्यात आचारसंहिता 
जिल्ह्यातील ३४८ ग्रामपंचायतींची निवडणूक १८ डिसेंबरला होत असून, २० डिसेंबरला या सर्व ग्रामपंचायतींची मतमोजणी  करून निकाल जाहीर केला जाणार आहे. यासंबंधीचा निवडणूक कार्यक्रम ९ नोव्हेंबरला निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. निवडणूक होत असलेल्या संबंधित ग्रामपंचायत क्षेत्रात आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. २३ डिसेंबरपर्यंत आचारसंहिता लागू राहणार असून, निवडणूक विभागाचे याकडे लक्ष राहणार आहे.

सरपंचाची निवड होणार थेट
n ऑक्टोबर ते डिसेंबर २०२२ या कालावधीत मुदत संपणाऱ्या व नव्याने स्थापित तसेच समर्पित आयोगाच्या अहवालात दिसत नसल्यामुळे मागील निवडणुकांमधून वगळलेल्या ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. जिल्ह्यातील ३४८ ग्रा. पं.तील सदस्य पदांसह थेट सरपंच पदासाठी निवडणूक होणार आहे. 

असा आहे निवडणूक कार्यक्रम
- २८ नोव्हेंबर : निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध करणे.
- २८ नोव्हेंबर ते २ डिसेंबर नामनिर्देशनपत्रे सादर करणे. 
- ५ डिसेंबर नामनिर्देशनपत्रांची छाननी करणे.
- ७ डिसेंबर दुपारी ३ वाजेपर्यंत नामनिर्देशनपत्र मागे घेता येतील. तर याचदिवशी दुपारी ३ वाजल्यानंतर निवडणूक चिन्ह वाटप व अंतिमरित्या निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करणे.
- १८ डिसेंबर मतदान 
- २० डिसेंबरला मतमोजणी तसेच निकाल घोषित करण्यात येईल.
- २३ डिसेंबरला जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत निवडणुकीच्या निकालाची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात येईल.

नेत्यांच्या वाढल्या गाठीभेटी 
ग्रामपंचायतीची निवडणूक ही कुठल्याही राजकीय पक्षाच्या चिन्हावर लढवली जात नसली, तरी गाव पातळीवर पॅनल तयार करून या निवडणुका लढविल्या जातात. हे पॅनल विविध राजकीय पक्षांचे असतात. स्थानिक राजकारणावर पकड मजबूत करण्यासाठी ग्रामपंचायत निवडणुका या महत्त्वपूर्ण आहेत. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षाच्या नेत्यांच्या गावपातळीवर  गाठीभेटी आणि बैठका वाढल्याचे चित्र आहे. 

अग्रवाल, रहांगडाले, जैन लागले कामाला
- स्थानिक राजकारणावर पकड मजबूत करण्यासाठी जास्तीत जास्त ग्रामपंचायत काबीज करणे गरजेचे आहे. जिल्ह्यात सर्वाधिक ७४ ग्रामपंचायतींची निवडणूक तिरोडा तालुक्यात व गोंदिया तालुक्यात ७० ग्रा.पं.ची निवडणूक होणार आहे. तिरोडा विधानसभेचे आ. विजय रहांगडाले, गोंदिया विधानसभा क्षेत्राचे आ. विनोद अग्रवाल व राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आ. राजेंद्र जैन हे निवडणुका होऊ घातलेल्या भागात सक्रिय होऊन कामाला लागल्याचे चित्र आहे.

 

Web Title: The reputation of MLAs of Gondia-Tiroda Assembly Constituency is at stake

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.