बायको गेली माहेरी; मुलाने विधवा आईचा केला खून

By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2023 12:23 PM2023-01-09T12:23:55+5:302023-01-09T12:25:31+5:30

शिवनगरातील घटना

The son killed the widowed mother over minor dispute | बायको गेली माहेरी; मुलाने विधवा आईचा केला खून

बायको गेली माहेरी; मुलाने विधवा आईचा केला खून

googlenewsNext

गोंदिया : पती-पत्नीच्या झालेल्या वादात पत्नी माहेरी गेली. यात तणावात राहणाऱ्या मुलाने आईला खाटेच्या ठाव्याने डोक्यावर मारून ठार केल्याची घटना शनिवारी (दि.७) दुपारी ३ वाजता शहरातील शिवनगर परिसरात घडली. लक्ष्मी भजनलाल पल्लारे (५४, रा. शिवनगर, भगतसिंग वॉर्ड, विजयनगर) असे मृत महिलेचे नाव आहे.

आरोपी दुर्गेश भजनलाल पल्लारे (२८) याने ७ जानवारी रोजी आपल्या पत्नीशी वाद केल्याने पत्नी त्याला सोडून माहेरी गेली. पत्नी निघाल्यानंतर आरोपीने घरातून बाहेर जाताना आई मृत लक्ष्मी पल्लारे यांना घरातच राहण्यास सांगितले होते. आरोपी आपल्या घरी परत आला असता आईसुध्दा घराबाहेर गेल्याचे माहिती झाले. थोड्या वेळातच आरोपीची आई लक्ष्मी पल्लारे घरी परत येताच आरोपीने त्यावरून त्यांच्याशी भांडण करून घरातील खाटेच्या लाकडी ठाव्याने तोंडावर, डोक्यावर व पाठीवर मारून गंभीर जखमी केले.

रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या लक्ष्मी पल्लारे यांना रुग्णवाहिकेने रूग्णालयात नेत असतानाच त्यांचा मृत्यू झाला. आरोपीची मामी पूर्णा डिलुचंद खरे (५५, रा. विमलताई शाळेजवळ, विजयनगर) यांच्या तक्रारीवरून रामनगर पोलिसांनी भादंविच्या कलम ३०२ अन्वये गुन्हा नोंद केला आहे. तपास सहायक पोलीस निरीक्षक प्रमोद कुरसुंगे करीत आहेत.

जादूटोण्याच्या संशयातून खुनाचा प्रयत्न

डुग्गीपार पोलिस ठाण्यांतर्गत येणाऱ्या कणेरी शेतशिवारावर शनिवारी (दि.७) सायंकाळी ५.३० वाजता रूका लखा मेश्राम (८५, रा. कनेरी) यांना आरोपी ईश्वरदास गुरुदास वाढई (४५, रा. कनेरी) याने तु माझ्यावर जादूटोणा करून माझ्या घराचा नाश केलास असे रागाचे भरात बोलून जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने डोक्यावर लोखंडी पात्याचे कुऱ्हाडीने मारून खुनाचा प्रयत्न केला. संपत रूका मेश्राम (५०, रा. कनेरी) यांच्या तक्रारीवरून डुग्गीपार पोलिसांनी भादंविच्या कलम ३०७ अन्वये गुन्हा नोंद केला आहे. तपास सहायक पोलीस निरीक्षक प्रमोद बांबोळे करीत आहेत.

Web Title: The son killed the widowed mother over minor dispute

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.