कल्लू यादववर गोळीबार करणारा दहावा आरोपी महिनाभरापासून फरारच!
By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2024 08:17 PM2024-02-18T20:17:04+5:302024-02-18T20:17:15+5:30
महिनाभरापासून पोलिसांची शोध मोहीम सुरूच: अटक झालेले नऊ आरोपी तुरूंगात.
गोंदिया: शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे शहर अध्यक्ष तथा माजी नगरसेवक लोकेश (कल्लू) यादव (४२, रा. बाराखोली, सिंधी कॉलनी, गोंदिया) यांच्यावर ११ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजताच्या सुमारास गोळीबार करून खुनाचा प्रयत्न करण्याच्या कटात मुख्य आरोपी असलेला प्रशांत उत्तत मेश्राम (३८) रा. भिमनगर गोंदिया हा मागील महिनाभरापासून फरार असून तो पोलिसांच्या हातात लागत नाही. गोंदिया शहर पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखा त्या आरोपीचा शोध घेत आहे.
माजी नगरसेवक कल्लू यादव यांच्यावर आर्थीक देवाण-घेवाणीतून गोळी झाडून खुनाचा प्रयत्न करण्याच्या कटात १० लोकांची नावे पुढे आली होती. या कटात प्रशांत उत्तत मेश्राम (३८) रा. भिमनगर गोंदिया हा मुख्य आरोपी होता. प्रशांत मेश्राम हा घटनेपासून फरार आहे. पोलिस त्याचा शाेध घेत असूनही त्यांच्या हातात तो लागत नाही. या प्रकरणातील नऊ आरोपींना अटक करून तुरूंगात पाठविण्यात आले. १२ जानेवारी रोजी आरोपी गणेश शिवकुमार शर्मा (२१) रा. भिंडी ले आऊट वरोडा ता. कळमेश्वर जि. नागपूर, अक्षय मधुकर मानकर (२८) रा. सम्राट ग्राउंड शिक्षक कॉलनी कळमेश्वर जि नागपूर, धनराज उर्फ रिंकू राजेंद्र राऊत (३२) रा. कुंभारेनगर गोंदिया व नागसेन बोधी मंतो (४१) रा. गौतमबुध्द वॉर्ड श्रीनगर गोंदिया यांना, १३ जानेवारीच्या रात्री ९:७ वाजता आरोपी शुभम विजय हुमने (२७) रा. भीमनगर गोंदिया व सुमित उर्फ पंछी विकास डोंगरे (२३) रा. कुंभारेनगर गोंदिया या दोघांना, १४ जानेवारी रोजी रोहित प्रेमलाल मेश्राम (३२, रा. कुंभारेनगर, गोंदिया) व १५ जानेवारी रोजी नितेश ऊर्फ मोनू लखनलाल कोडापे (२८, रा. विहीरगाव, तिरोडा- ह.मु. कुंभारेनगर, गोंदिया) व मयूर ऊर्फ सानू विजय रंगारी (२७, रा. सिंगलटोली, आंबेडकर वाॅर्ड, गोंदिया) यांना अटक करण्यात आली होती. सर्व आरोपींना २२ जानेवारीपर्यंत पोलिस कोठी सुनावली होती. २३ जानेवारपासून त्यांची भंडारा येथील तुरूंगात रवानगी करण्यात आली आहे.
मुख्य फरार आरोपीचा शोध सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय गराड, गोंदिया शहर पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस करीत आहेत.