चोरीच्या आरोपीचा पोलीस कोठडीतच मृत्यू, पोलिसांनी अशी वर्तवली शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2021 08:23 AM2021-05-22T08:23:34+5:302021-05-22T08:24:19+5:30

आमगाव पोलिस ठाण्यातील घटना: हृदयविकाराने मृत्यू झाल्याचा संशय

Theft accused died in police custody in gondia, police said | चोरीच्या आरोपीचा पोलीस कोठडीतच मृत्यू, पोलिसांनी अशी वर्तवली शक्यता

चोरीच्या आरोपीचा पोलीस कोठडीतच मृत्यू, पोलिसांनी अशी वर्तवली शक्यता

Next
ठळक मुद्देस्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी राजकुमार अभय कुमार (३०), सुरेश धनराज राऊत (३१) राजकुमार गोपीचंद मरकाम (२२) व एक अल्पवयीन बालक अशा चौघांना अटक केली होती.

गोंदिया : जिल्हयातील मालमत्ता, चोरी घरफोडी करणारे गुन्हेगार यांचा शोध घेण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी २० मे रोजी आमगावच्या जिल्हा परिषद शाळेतुन दोन वेळा चोरी करणाऱ्या चार आरोपींना पकडले होते. त्यापैकी मुख्य आरोपी राजकुमार अभयकुमार (३०) राहणार कुंभारटोली याच्या पोलिस कस्टडीतच मृत्यू झाला आहे. 

स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी राजकुमार अभय कुमार (३०), सुरेश धनराज राऊत (३१) राजकुमार गोपीचंद मरकाम (२२) व एक अल्पवयीन बालक अशा चौघांना अटक केली होती. एक विधी संघर्ष बालक असल्यामुळे त्याला सोडून तिघांना पोलीस कस्टडीत ठेवण्यात आले होते पोलीस कस्टडीतच राजकुमार अभयकुमार याचा मृत्यू झाला आहे. यासंदर्भात ठाणेदार सुभाष चव्हाण यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली असता त्यांनी या घटनेला दुजोरा दिलेला आहे. राजकुमारचा मृत्यू नेमका कशामुळे ही बाब अस्पष्ट होऊ शकली नसली तरी त्याला खूप घाम आला होता. त्यामुळे हृदयविकाराचा झटक्यामुळेच त्याचा मृत्यू झाल्याचा संशय ठाणेदार चव्हाण यांनी व्यक्त केला आहे.
 

Web Title: Theft accused died in police custody in gondia, police said

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.