अधिकाºयांना ‘चकमा’ देऊन चोर पसार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2017 01:53 AM2017-08-12T01:53:37+5:302017-08-12T01:54:19+5:30

Theft expulsion by the officers 'Chakma' | अधिकाºयांना ‘चकमा’ देऊन चोर पसार

अधिकाºयांना ‘चकमा’ देऊन चोर पसार

Next
ठळक मुद्देगौण खनिजांची चोरी : गंगाझरी पोलिसांचा तक्रार घेण्यास नकार

लोकमत न्यूज नेटवर्क
काचेवानी : गौण खनिजांचे अवैधपणे खनन करणाºयाना गौण खनिज चोरी प्रतिबंधक पथकाने तेथे जाऊन परवाना मागितला. मात्र चोरट्यांनी परवाना नसल्याचे सांगिल्यावर त्यांना गंगाझरी पोलीस ठाण्यात उपस्थित राहण्यास सांगितले. मात्र ते तेथे न जाता पथकाला चकमा देत दुसºयास दिशेने पळून गेल्याची घटना दोन दिवसांपूर्वी काचेवानी परिसरात घडली.
मुरूमाची चोरी करून अवैध वाहतूक करणाºया ट्रॅक्टर चालकाची तक्रार नोंदविण्यास गंगाझरी पोलिसांनी नकार दिला. अशी माहिती संबंधित तलाठ्याने तिरोडा तहसीलदार यांना सांगितले. तिरोड्याचे तहसीलदार संजय रामटेके यांच्या मार्गदर्शनात अवैध गौण खनिज चोरी व वाहतूक करणाºयांवर आळा घालण्यासाठी पथक तयार करण्यात आले. पथक प्रमुख नायक तहसीलदार नरवडे, साजा-५ बघोलीचे तलाठी जे.पी. उईके, साजा-७ बोदाचे तलाठी जी.बी. हटवार व साजा-७ करटी बु.चे तलाठी एम.एस. गेडाम हे गस्त घालत असताना बोराटोला येथील तलावात मुरूम खोदून वाहनात भरले जात होते.
पथकाने तेथे जावून ट्रॅक्टर चालक व मजुरांना खोदकाम व वाहतुकीचा परवाना मागितला. मात्र त्यांना परवाना नसल्याचे सांगण्यात आले. ट्रॅक्टर क्रमांक एमएच ३५/जी-५८४२ व ट्राली क्रमांक एमएच ३५/एफ-२७११ च्या मालकाला बोलाविण्यात आले. दंड व रॉयल्टी मिळून चार हजार ९०० रूपये भरण्यास सांगण्यात आले. त्यामुळे ट्रॅक्टरमालक अमोल मधूकर गावंडे याने नकार दिला.
तसेच ट्रॅक्टरसह मालक गावंडे, चालक सहदेव शेंडे, घनश्याम नेवारे, किशोर उईके, रूद्रराज पटले व खुशाल नंदूरकर यांना गंगाझरी पोलीस ठाण्यात उपस्थित होण्यास नायब तहसीलदारांनी सांगितले. मात्र अमोल गावंडे व सर्वांनी संगनमत करून गंगाझरी पोलीस ठाण्यात न जात करटी बु.च्या दिशेने पसार झाले. ही घटना ३ आॅगस्टला सकाळी ११.१५ वाजता घडली. पथक प्रमुखांच्या आदेशाप्रमाणे या प्रकरणाची तक्रार साजा-५ चे तलाठी जे.पी. उईके यांनी पथकासह गंगाझरी पोलीस ठाण्यात जावून अवैध गौण खनिज उत्खनन संदर्भात सहा आरोपींविरूद्ध तक्रार दाखल करण्याची विनंती केली. मात्र एपीआय मेश्राम यांनी आरोपींना आणा तेव्हाच तक्रार नोंदवू अन्यथा तक्रार नोंदविणार नाही, अशी भूमिका घेतल्याचा आरोप आहे.
याबाबत लगेच तलाठी उईके यांनी पोलीस तक्रार घेत नसल्याची माहिती तहसीलदारांकडे केली. त्या तक्रारीनुसार ठाणेदार शीतल यादव व एपीआय मेश्राम यांनी १२.३० ते ४ वाजतापर्यंत थांबवून ठेवले. शेवटी ट्रॅक्टर व चोरी गेलेला मुरूम घेवून या, तेव्हाच गुन्हा नोंद करू,
असे सांगून तक्रार नोंदविले नसल्याचे सांगितले.
पोलिसांना तक्रार परत करता येत नाही
फिर्यादी पोलिसात तक्रार नोंदविण्यास गेल्यास कोणत्याही परिस्थितीत तक्रार नोंदविणे भाग आहे, असे निर्देश आहेत. चौकशीअंती गुन्हा नोंद करणे किंवा न करणे, हे तपासाअंती ठरविले जाते. परंतु तक्रार घ्यावीच लागते. मात्र पोलिसांनी तक्रार परत करण्यामागील कारण अनुत्तरीत आहे. आता तहसीलदार संजय रामटेके त्या ट्रॅक्टर मालक व तक्रार न नोंदविणाºया पोलिसांबाबत कोणती भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
 

Web Title: Theft expulsion by the officers 'Chakma'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.