‘त्यांची’ दिवाळी अंधारात!

By admin | Published: October 25, 2015 01:49 AM2015-10-25T01:49:13+5:302015-10-25T01:49:13+5:30

जिल्ह्यात ८ आदिवासी आश्रम शाळा असून शिक्षकांचे व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे माहे जुलै २०१५ पासूनचे ४ महिन्यांचे वेतन अडले आहेत.

Their 'dark' Diwali! | ‘त्यांची’ दिवाळी अंधारात!

‘त्यांची’ दिवाळी अंधारात!

Next

वेतन अडले : आश्रमशाळांतील शिक्षकांचा उपोषणाचा इशारा
करडी (पालोरा) : जिल्ह्यात ८ आदिवासी आश्रम शाळा असून शिक्षकांचे व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे माहे जुलै २०१५ पासूनचे ४ महिन्यांचे वेतन अडले आहेत. आदिवासी प्रकल्प अधिकाऱ्याला अनेकदा कळवूनही उपयोग झालेला नाही. वेतन अडल्याने शिक्षकांची व कर्मचाऱ्यांची दिवाळी अंधारात जाण्याची शक्यता आहे. शिक्षकांच्या समस्येकडे दुर्लक्ष असल्याचा आरोप संघटनेचा आहे.
जिल्ह्यात ८ आदिवासी आश्रम शाळा कार्यरत आहेत. यामध्ये तुमसर तालुक्यातील येरली, आंबागड, पवनारखारी, चांदपूर, त्याचबरोबर भंडारा तालुक्यातील कोका, पवनी तालुक्यातील आदर्श आमगाव, लाखनी तालुक्यातील माडगी, साकोली तालुक्यातील खांबा जांभळी या आश्रम शाळांचा समावेश आहे. सर्व शाळांमध्ये जवळपास २२५ शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. मात्र येथील कार्यरत शिक्षक व कर्मचाऱ्यांना वेतनाअभावी काम व उपासमारीची वेळ आली आहे.
दिवाळी हा प्रकाशाचा सण काही दिवसांच्या अवधीवर आहे. सगळीकडे त्यादृष्टीने तयारी जोरात सुरू आहेत. मात्र येथील कर्मचाऱ्यात नाराजीचे वातावरण आहे. दिवाळीचा आनंद व्यक्त करण्यासाठी येथील कर्मचाऱ्यांना कठिनाईचा सामना करावा लागत आहे. कर्मचाऱ्यांचे माहे जुलै २०१५ पासूनचे ४ महिन्यांचे वेतन प्रलंबित आहे. वेतनासंबंधीच्या मागण्या अनेकदा संबंधितांकडे करूनही प्रश्न अडून पडला आहे. शिक्षकांच्या व कर्मचाऱ्यांच्या प्रश्नाकडे कुणाचेही लक्ष नाही. शिक्षकांचे संपूर्ण कुटूंब त्यामुळे चांगलेच अडचणीत सापडले आहेत.
सणाचे निमित्ताने घरी येणाऱ्या पाहुण्यांचे स्वागत करायचे की नाही गोड धोड करून उत्साह वाढवायचा कि नाही, हा प्रश्न निर्माण झाला आहे. ४ महिन्यांच्या उधारीमुळे दुकानदारही किराणा द्यायला तयार नाहीत. दुकानातून उधारी मिळण्यास मागे पुढे पाहिले जात आहे. घरांची साफ सफाई, रंगरंगोटी व दुरूस्तीचे कामे बंद पडली आहेत. आदिवासी प्रकल्प विभागाला अनेकदा यासंबंधाने कळविण्यात आले. परंतु विभागाचे दुर्लक्ष होत आहे. शिक्षक आमदार ना.गो. गाणार यांनाही याप्रकरणी कळविण्यात आले. त्यांनी नागपूर प्रकल्प आयुक्तांची भेट घेतली. त्यांना समस्या समजावून सांगितली.
आ.गाणार यांचे सोबत शिक्षकांचे शिष्टमंडळ यावेळी उपस्थित होते. मात्र समाधान निघाले नाही. आदिवासी प्रकल्प विभागाने दिवाळीपुर्वी वेतन अदा न केल्यास उपोषणाचा इशारा दिला आहे.

Web Title: Their 'dark' Diwali!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.